जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महाराष्ट्र, दिल्लीत पुन्हा कोरोनाची दहशत! एका दिवसात 1400 हून अधिक संक्रमित

महाराष्ट्र, दिल्लीत पुन्हा कोरोनाची दहशत! एका दिवसात 1400 हून अधिक संक्रमित

कोरोना

कोरोना

Coronavirus Cases: देशाची राजधानी दिल्लीतही कोरोना विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 6 एप्रिल : देशात कोरोना संसर्गाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. विशेषतः महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गुरुवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 803 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे आदल्या दिवसाच्या तुलनेत खूप जास्त आहे. त्याचवेळी, राज्यात गेल्या 24 तासांत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. इतक्या नवीन प्रकरणांनंतर महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा एकदा चार हजारांच्या जवळ पोहोचली आहे. महाराष्ट्रात सध्या 3,987 सक्रिय रुग्ण आहेत. याआधी बुधवारी राज्यात कोविड-19 च्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर 569 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तर मंगळवारी राज्यात 711 नवीन रुग्ण आढळले होते. देशात कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे पाहता केंद्रही अॅक्शन मोडमध्ये आले आहे. राज्यांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री शुक्रवारी बैठक घेणार आहेत. त्याचवेळी महाराष्ट्राव्यतिरिक्त देशाची राजधानी दिल्लीतही कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी दिल्लीत कोरोनाचे 606 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी येथे 340 लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 3569 चाचण्या करण्यात आल्या आहेत, त्यापैकी 606 पॉझिटिव्ह आहेत, तर संसर्गाचे प्रमाण 16.98% आहे. आरोग्य विभागानेही एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. मृत्यूचे प्राथमिक कारण कोविड नसले तरी. सध्या, राष्ट्रीय राजधानीत सक्रिय प्रकरणांची संख्या 2060 आहे. त्याचवेळी राजस्थानमध्येही कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. गुरुवारी राज्यात आणखी 100 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. तर या जीवघेण्या विषाणूची लागण झालेल्या आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. वैद्यकीय आणि आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी राज्यात आणखी 100 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये राजधानी जयपूरमधील 21, राजसमंदमधील 13, जोधपूरमधील 10, बिकानेरमधील नऊ, अलवर-चितोडगड-उदयपूरमधील 7-7, पालीमधील सहा रुग्णांचा समावेश आहे. वाचा - सर्वात डेंजर Omicron XBB.1.16 चा कहर! 24 तासांतच 5000 कोरोना रुग्ण; जीव वाचवण्यासाठी 3 गोष्टी तुमच्याकडे हव्याच गुरुवारी देशात 5,335 नवीन रुग्णांची नोंद भारतात एका दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 5,335 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर, देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 4,47,39,054 झाली आहे. गेल्या 195 दिवसांत नोंदवलेल्या दैनंदिन प्रकरणांची ही सर्वाधिक संख्या आहे. त्याच वेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 25,587 झाली आहे. सध्या देशात 25,587 लोक कोरोना विषाणू संसर्गावर उपचार घेत आहेत, जे एकूण प्रकरणांपैकी 0.6 टक्के आहे. रुग्णांच्या बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.75 टक्के आहे. देशातील संसर्गाचा दैनंदिन दर 3.32 टक्के आणि साप्ताहिक दर 2.89 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 4,41,82,538 लोक संसर्गमुक्त झाले आहेत, तर कोविड-19 मुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. भारतातील देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत कोविड-19 विरोधी लसींचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात