नवी दिल्ली, 06 एप्रिल : भारतात पुन्हा एकदा कोरोना ची प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत. सरकारने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोविडची 5 हजारांहून अधिक प्रकरणे आढळून आली आहेत. यासह, आता कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 25 हजारांहून अधिक झाली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या नवा सबव्हेरिएंटने आता टेन्शन वाढवलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. आता कोविड बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. इतकेच नाही तर दररोज कोविड प्रकरणांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉनचे नवीन प्रकार भारतात चिंताजनक वेगाने पसरत असल्याचं म्हटलं आहे. Omicron XBB.1.16 हा नवा व्हेरिएंट जुन्या व्हेरियंटपेक्षा जास्त धोकादायक असल्याचं सांगितलं जातं आहे.
या नव्या व्हेरिएंटपासून स्वतःचा बचाव करण्याचे जीव वाचवण्याचे तीन मार्ग आहेत. अशा तीन गोष्टी आहेत, ज्या या व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी तुमच्याकडे असायलाच हव्यात. त्या खालीलप्रमाणे. Shocking! मासे खाणाऱ्यांनो जरूर वाचा ही बातमी; नाहीतर तुमच्याही जीवावर बेतेल मास्कचा वापर करा कोरोनापासून वाचण्यासाठी लोकांनी मास्कचा वापर करावा, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. हा विषाणू हवेत राहतो. श्वासाद्वारे, ते निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करू शकतात आणि त्यास संक्रमित करू शकते. एवढंच नाही तर लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. हँड सॅनिटायझर कोरोनापासून वाचण्यासाठी हात साबणाने आणि पाण्याने चांगले धुवावेत असा सल्ला दिला जातो. पण जर तुमच्याकडे हँड सॅनिटायझर असेल तर तेदेखील वापरता येते. आता तुम्ही हँड सॅनिटायझर सोबत ठेवू शकता आणि त्याचा नियमित वापर करू शकता हृदयाची शस्त्रक्रिया झाली तरी 150 मीटर धावत जाऊन ‘तिने’ वाचवले रेल्वे प्रवाशांचे प्राण ऑक्सिमीटर सोबत ठेवा हवामान बदलाबरोबर खोकला, सर्दी, ताप, सर्दी यांसारख्या तक्रारीही वाढू लागतात. परंतु हे Omicron XBB.1.16 प्रकाराची लक्षणे देखील असू शकतात. यामध्ये शरीरातील ऑक्सिजनची पातळी अचानक कमी होऊ शकते. अशा स्थितीत श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. असे कोणतेही लक्षण दिसल्यास ऑक्सिजनची पातळी ऑक्सिमीटरने तपासता येते.