जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्यात 3 वाजल्यापासून अखेर पूर्ण लॉकडाऊन, बेशिस्तपणाला लगाम लावण्यासाठी निर्णय

पुण्यात 3 वाजल्यापासून अखेर पूर्ण लॉकडाऊन, बेशिस्तपणाला लगाम लावण्यासाठी निर्णय

देशभरातील ज्या शहरांतील कोरोना स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे, त्यामध्ये पुणे शहराचाही समावेश आहे. त्यातच शहरातील आरोग्य व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. आता मात्र यामध्ये काहीसा बदल होणार आहे.

देशभरातील ज्या शहरांतील कोरोना स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे, त्यामध्ये पुणे शहराचाही समावेश आहे. त्यातच शहरातील आरोग्य व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. आता मात्र यामध्ये काहीसा बदल होणार आहे.

अनेकजण शहरातून गावाकडे धाव घेत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 23 मार्च : पुणे शहरातल्या रस्त्यावरची सगळी वाहतूक तीन वाजता बंद करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा देणारी वाहनं रस्त्यावर येऊ शकतात, असा आदेश पोलिसांकडून लागू करण्यात आला आहे. पुणे पोलीस पीए सिस्टीमवर याबाबत अनाऊंसमेंट करत आहेत. त्यामुळे पुणे आता पूर्णपणे लॉकडाऊन होणार आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यभरात कलम 144 लागू करण्याची घोषणा करत जमावबंदी केली आहे. मात्र तरीही लोक रस्त्यावर उतरत आहेत. अनेकजण शहरातून गावाकडे धाव घेत आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांखेरीज कुठलीच वाहने रस्त्यावर येणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे, कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांना राज्य सरकारने क्वारंटाइनमध्ये राहण्याचं आवाहन केलं आहे. कम्युनिटीमध्ये कोरोनाचा (Covid - 19) प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी परदेशातून भारतात आलेल्यांना पुढील किमान 14 दिवस क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी सरकारच्या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. पुण्यात (Pune) परदेशातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाइनमध्ये राहण्याचं आवाहन केलं होतं. शिवाय त्यांच्या हातावर तसा शिक्काही मारण्यात आला आहे. त्यातील काहीजण अचानक बेपत्ता झाले आहेत. पुणे पोलिसांनी त्यांना हजर राहण्याचं आवाहन केलं आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: pune news
  • First Published :
जाहिरात
जाहिरात