Home /News /maharashtra /

Omicron Variant: देशभरात झपाट्यानं प्रसार; महाराष्ट्र ओमायक्रॉनचा Hotspot, रुग्णांचा आकडा 88 वर

Omicron Variant: देशभरात झपाट्यानं प्रसार; महाराष्ट्र ओमायक्रॉनचा Hotspot, रुग्णांचा आकडा 88 वर

कोरोनाचे (Corona Virus) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) देशात झपाट्यानं पसरत आहे. आतापर्यंत 11 राज्यांमध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

    नवी दिल्ली, 17 डिसेंबर: कोरोनाचे (Corona Virus) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) देशात झपाट्यानं पसरत आहे. आतापर्यंत 11 राज्यांमध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही तासात, महाराष्ट्र (Maharashtra) आणि केरळमध्ये (Kerala) 4-4 प्रकरणे, तेलंगणामध्ये 2 (Telangana), पश्चिम बंगाल (West Bengal) आणि तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) 1-1 प्रकरणे नोंदवली गेली, ज्यामुळे देशातील ओमायक्रॉन संक्रमितांची संख्या 88 वर पोहोचली. राज्यानुसार महाराष्ट्रात 32, राजस्थानमध्ये 17, दिल्लीत 10, कर्नाटकात 8, तेलंगणात 7, केरळमध्ये 5, गुजरातमध्ये 5, तर आंध्र प्रदेश, चंदीगड, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये 1-1 रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. हेही वाचा-  Omicron च्या दहशतीत दिलासादायक बातमी! कोरोना लस व्हेरिएंट प्रूफ विकसित करता येणार महाराष्ट्र हे ओमायक्रॉनचे हॉट स्पॉट बनत असल्याचं या आकडेवारीवरून दिसून येत आहे. दरम्यान आरोग्य विभागाने जानेवारीमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली असून, त्यानंतर जानेवारीमध्ये महाराष्ट्रात ओमायक्रॉनची नवी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाबत निर्बंध वाढवण्यात आले आहेत. न्यू ईयर आणि ख्रिसमस संदर्भात सरकारचा अलर्ट मुंबईत न्यू ईयर आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर 16 ते 31 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात 50 टक्के क्षमतेनुसार लोकांना येण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राजधानी दिल्लीतही न्यू ईयर आणि ख्रिसमसमुळे प्रकरणांमध्ये वाढ होण्याच्या भीतीने 31 डिसेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. फक्त 50 टक्के लोकांना बार आणि रेस्टॉरंटमध्ये बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. अनेक राज्ये ओमायक्रॉनबाबत सतर्क असून त्यांनी नवी नियमावली जारी केली आहे. केंद्र सरकारनंही पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, केंद्रानं सर्व राज्यांना ऑक्सिजन प्लांट्स पूर्णपणे कार्यरत आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी मॉक ड्रिल घेण्याचा सल्ला दिला आहे. हेही वाचा-  Breaking: विद्यार्थ्यांनो, दहावी बारावीच्या परीक्षांची तारीख ठरली; जाणून घ्या कधी होणार तुमची परीक्षा
     केंद्र सरकार वर्षाच्या अखेरीस कोरोना लसीकरण योजनेचाही आढावा घेईल, ज्यामध्ये लहान मुलांना लसीकरण आणि वृद्धांना बूस्टर डोस देण्याबाबत चर्चा केली जाईल.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Corona hotspot, Coronavirus, Coronavirus cases

    पुढील बातम्या