मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ओमायक्रॉनची भीती! राज्यातल्या या जिल्ह्यात पहिली जमावबंदी लागू; रॅली, आंदोलनावर बंदी

ओमायक्रॉनची भीती! राज्यातल्या या जिल्ह्यात पहिली जमावबंदी लागू; रॅली, आंदोलनावर बंदी

ओमायक्रॉन (Omicron) आता महाराष्ट्रात (maharashtra) धडकला आहे.  रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभाग, राज्य सरकार तसंच प्रशासन सतर्क झालंय.

ओमायक्रॉन (Omicron) आता महाराष्ट्रात (maharashtra) धडकला आहे. रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभाग, राज्य सरकार तसंच प्रशासन सतर्क झालंय.

ओमायक्रॉन (Omicron) आता महाराष्ट्रात (maharashtra) धडकला आहे. रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभाग, राज्य सरकार तसंच प्रशासन सतर्क झालंय.

  • Published by:  Pooja Vichare
अकोला, 05 डिसेंबर: कोरोना व्हायरसचा (corona) नवा व्हेरिएंट ओमायक्रॉननं (Omicron)राज्याची चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉन (Omicron) आता महाराष्ट्रात (maharashtra) धडकला आहे. दक्षिण आफ्रिकेवरून कल्याण डोंबिवलीमध्ये (dombivali) आलेला एक 33 वर्षीय तरुण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह (omicron positive) आढळला आहे. रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभाग, राज्य सरकार तसंच प्रशासन सतर्क झालंय. याच पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात 4 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू केलेत. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार टाळण्यासाठी अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय. अकोला पहिलाच जिल्हा जिथे जमावबंदी झाली लागू ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढू नये म्हणून अकोला जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निर्बंध लावण्यात आलेत. कोरोनाचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट आढळून आल्यानंतर जमावबंदीसारखे निर्बंध लावणारा अकोला हा पहिलाच जिल्हा आहे. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्ह्यात या व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. जिल्ह्यात जमावबंदी जिल्ह्याधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, 4 डिसेंबरच्या अकोला जिल्ह्यात मध्यरात्री 12 वाजल्यापासून पासून शहरी आणि ग्रामीण भागात जमावबंदीचा आदेश लागू असणार आहे. या काळात कोणत्याही प्रकारची रॅली, धरणे, आंदोलन, मोर्चा तसेच इतर कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी असणार आहे. डोंबिवलीत आढळला पहिला रुग्ण! दक्षिण आफ्रिकेवरून कल्याण डोंबिवलीमध्ये आलेल्या एक 33 वर्षीय तरुण हा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यातील ही पहिली केस आहे. या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसंच, कल्याण डोंबिवलीमध्ये परदेशातून आलेले सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. नायजेरिया,रशिया आणि नेपाळ मधून केडीएमसी क्षेत्रात आलेले प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. या सहा ही जणांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवले आहे.
First published:

Tags: Akola, Akola News, Night Curfew

पुढील बातम्या