मुंबई, 30 जून: देशात कोरोनाची (Covid-19)दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येत आहे. मात्र कोरोनाचा सर्वाधिक प्रार्दुभाव हा महाराष्ट्र (Maharashtra)राज्यात आहे. महाराष्ट्र राज्यात मंगळवारी 8085 नवे रुग्ण आढळून आले. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा हळूहळू वाढताना दिसत आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी रुग्णसंख्या वाढली. सोमवारी 6,727 इतका आकडा होता.
दरम्यान असं म्हटलं जात आहे की, अचानक झालेल्या रुग्ण वाढीमागे राज्यातील चाचण्यांचा वाढता वेग आहे. राज्यात सरकारनं कोरोना चाचणीचा वेग वाढवला आहे. त्यामुळे अनेक रुग्ण आढळून येत आहे. मंगळवारी एकूण 1 लाख 90 हजार 140 सॅम्पलची टेस्टिंग झाली. तर सोमवारी हा आकडा 1 लाख 66 हजार 163 इतका होता.
दरम्यान राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण महाराष्ट्रात आढळून आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झालं आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक पावले उचलली जाताहेत. हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले की, जर महाराष्ट्राला लसीचे पुरेसे डोस मिळाले तर अवघ्या दोन महिन्यांत संपूर्ण राज्यातल्या जनतेचं लसीकरण होऊ शकेल. तसंच डेल्टा प्लस व्हेरिएंटचे राज्यात 21 रुग्ण आढळून आले. त्या रुग्णांमध्ये केवळ एकाच रुग्णाला लसीचा पहिला डोस मिळाला होता.
हेही वाचा- नव्या स्ट्रेनचा होणार शास्त्रीय अभ्यास, संशोधनासाठी 100 नमुने पुण्याकडे रवाना
शुक्रवारी डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे एका 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्य सरकारनं राज्यात निर्बंध लागू केले आहेत. लसीकरणाचा वेग वाढवून आता अधिकाधिक लोकांना लस दिली जाईल असे सरकारनं म्हटलं आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या जिल्ह्यात मॉलसह अन्य सार्वजनिक ठिकाणे उघडण्याचा निर्णय काही दिवसांसाठी स्थगित केला आहे. सध्या राज्यात अन्य दुकानं आणि सार्वजनिक कार्यालय संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्यास परवानगी आहे.
राज्यातल्या कोरोना रुग्णांचा आकडा
राज्यात मंगळवारी 8 हजार 085 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 8 हजार 623 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण 58 लाख 9 हजार 548 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 17 हजार 098 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात काल 231 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
हेही वाचा- HBD: वजन कमी करत सर्वांनाचं दिला होता धक्का;अविका गोरचा अनोखा किस्सा
सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के इतका असून आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 13 लाख 98 हजार 501 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 51 हजार 633 (14.62 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 21 हजार 836 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3 हजार 584 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus