छोट्या पडद्यावरील 'बालिका वधू' या मालिकेमुळे आनंदी म्हणजेच अविका गोर घराघरात पोहोचली होती. बालकलाकार म्हणून अभिनयास सुरुवात केलेली अविका आज एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मात्र गोड चेहऱ्याच्या आनंदीचं वजनदेखील खुपचं वाढलं होतं. अविकाने आपल्या फिटनेसवर प्रचंड कष्ट घेतले आहेत. अविकाने काही महिन्यातचं चक्क 13 किलो वजन कमी करत सर्वांनाच धक्का दिला होता. आज अविका आधीपेक्षाही सुंदर आणि फिट दिसून येते. ही गोंडस अभिनेत्री आज आपला 23 वा वाढदिवस साजरा करत आहे.