जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Mumbai Corona Update : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका, मुंबईत एयरपोर्ट-रेल्वे स्टेशनवर येणाऱ्यांसाठी नवे नियम

Mumbai Corona Update : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका, मुंबईत एयरपोर्ट-रेल्वे स्टेशनवर येणाऱ्यांसाठी नवे नियम

Mumbai Corona Update : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका, मुंबईत एयरपोर्ट-रेल्वे स्टेशनवर येणाऱ्यांसाठी नवे नियम

भारतात कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरियंटचा सब-व्हेरियंट बीएफ.7 व्हेरियंटचे तीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेनेही तयारी सुरू केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 डिसेंबर : चीन आणि जगातल्या अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जलद गतीने वाढत आहे. भारतात कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरियंटचा सब-व्हेरियंट बीएफ.7 व्हेरियंटचे तीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे अलर्ट झालं आहे. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेनेही तयारी सुरू केली आहे. प्रत्येक दिवशी येणाऱ्या कोरोना रुग्णांचे सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी लॅबमध्ये पाठवले जात आहेत, असं कोव्हिड टास्क फोर्स बीएमसीच्या सदस्य डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितलं. आतापर्यंत मुंबईत ओमिक्रॉन व्हेरियंटच्या सब-व्हेरियंट बीएफ.7 चा एकही रुग्ण सापडलेला नाही. बीएमसीकडून मुंबई एयरपोर्ट आणि रेल्वे स्टेशनवर रॅण्डम चेकिंग करायला सांगण्यात आलं आहे. ‘आम्ही सर्व तयारी केली आहे. आमच्याकडे बेड, औषधं, लस यांच्यासह गरजेच्या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. लोकांनी सार्वजनिक आणि गर्दी असलेल्या ठिकाणी जाणं टाळावं. जर जायचं असेल तर मास्कचा वापर करावा. बीएफ.7 सब-व्हेरियंटचा परिणाम अजून भारतात दिसलेला नाही, पण जर आला तर थोडासा स्पाईक दिसेल,’ असं भन्साळी यांनी सांगितलं. ‘चीनपेक्षा आपल्या दोन्ही लसी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन परिणामकारक आहेत. चीनमध्ये पुन्हा कोरोना वाढण्याचं एक कारण त्यांची लस परिणामकारक नसणं हा आहे. आम्ही वारंवार केंद्र आणि राज्य सरकारच्या संपर्कात आहोत. जे दिशा-निर्देश येत आहेत त्यानुसार आम्ही पावलं उचलत आहोत. लोकांनी पॅनिक व्हायची गरज नाही. फक्त सावध राहणं गरजेचं आहे,’ असं डॉ. भन्साळी म्हणाले. राज्यात 95 टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. लहान मुले व वृद्ध नागरिकांनी शक्यतो मास्क वापरावा, असे आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. आरोग्यमंत्र्यांनी सांगितली राज्यातील कोरोनाची परिस्थिती, नवी नियमावली जाहीर आयएमएची मार्गदर्शक तत्त्व 1. प्रत्येकाने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावे, असे आवाहन आयएमएने केले आहे 2. साबणाने हात धुवा, सॅनिटायझर वापरा 3. IMA ने सामाजिक अंतर पाळण्यास सांगितले. 4. सार्वजनिक मेळावा टाळण्याच्या सूचना आयएमएने केल्या आहेत. 5. शक्य असल्यास आंतरराष्ट्रीय प्रवास टाळा. 6. सर्दी, खोकला, सर्दी यांसारख्या लक्षणांसाठी चाचणी घ्या 7. लग्न समारंभ, मेळावा पुढे ढकलण्यात यावा, असे आवाहन आयएमएने केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona , covid19
  • First Published :
जाहिरात
जाहिरात