मुंबई, 22 डिसेंबर : ओमिक्रॉनचा व्हेरिएन्ट 4 जणांना संक्रमित करत होता. तर हा नविन व्हेरिएंट आहे. त्यासाठी नविन पंचसुत्री अंमलात आणावी लागेल. तसेच 95 टक्के लोकांचे लसीकरण सुरू आहे. अजून महाराष्ट्रात Bf7 चा एकही रूग्ण आढळलेला नाही. घाबरून जायचे कारण नाही, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले आहेत. तसेच लहान मुले व वृद्ध नागरिकांनी शक्यतो मास्क वापरावा, असे आवाहनही त्यांनी केले. विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे रॅन्डीमली थर्मल स्क्रिनिंग केले जाईल. त्यामळे प्रिकॅाशनरी डोस घ्यावा, अशी सुचना आहे. यंत्रणा पुर्णपणे सजग आहे. संपुर्ण राज्यात आता कोरोनाचे फक्त 132 सक्रीय रुग्ण आहेत. तसेच ॲाक्सिजन आणि इतर अत्यावश्यक साहित्य तपासून घेण्याचे आदेश दिले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासी जे येतील त्यांचे थर्मल टेस्टींग केले जाणार आहे. राज्य टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला जाईल. टास्क फोर्स जुनी आहे. डॅाक्टर यांच्या अध्यक्षते खाली ही टास्क फोर्स असेल, असेही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनासंदर्भात बंधने काही आली नाहीयेत पण काळजी घ्या, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. तर BF7 व्हेरीयेंट आपल्याकडे नाहीये, असेही ते म्हणाले आहेत. हेही वाचा - Fact Check : खोकला नाही, ताप नाही; ही आहेत नव्या कोरोना विषाणूची लक्षणं?
लग्न समारंभ, मेळावे पुढे ढकला -
आयएमएच्या नवीन मार्गदर्शिकेत काय - 1. प्रत्येकाने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावे, असे आवाहन आयएमएने केले आहे 2. साबणाने हात धुवा, सॅनिटायझर वापरा 3. IMA ने सामाजिक अंतर पाळण्यास सांगितले. 4. सार्वजनिक मेळावा टाळण्याच्या सूचना आयएमएने केल्या आहेत. 5. शक्य असल्यास आंतरराष्ट्रीय प्रवास टाळा. 6. सर्दी, खोकला, सर्दी यांसारख्या लक्षणांसाठी चाचणी घ्या 7. लग्न समारंभ, मेळावा पुढे ढकलण्यात यावा, असे आवाहन आयएमएने केले आहे.