नाशिकमधून कोरोनाबाबत दिलासादायक बातमी, 34 संशयितांची चाचणी निगेटिव्ह

नाशिकमधून कोरोनाबाबत दिलासादायक बातमी, 34 संशयितांची चाचणी निगेटिव्ह

कोरोनासोबत स्वाईन फ्ल्यूचे 2 रुग्णही या विशेष कक्षात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे

  • Share this:

नाशिक,20 मार्च : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 52 वर पोहोचली आहे. नाशिकमध्ये 43 संशयित आढळून आले होते. दिलासादायक बाब म्हणजे, यातील 34 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

नाशिकमध्ये 20 देशातून प्रवास करून आलेल्या प्रवाशांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. एकूण 43 जण संशयित म्हणून त्यांच्यावर कोरोना कक्षात उपचार करण्यात आले. यातील 43 पैकी 34 संशयितांचा अहवाल आला असून हे 34 जण निगेटिव्ह आढळून आले आहे.

तर इतर 9 रुग्णांना विशेष कोरोना कक्षात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. या 9 रुग्णांचा तपासणी अहवाल येणे अजून बाकी आहे. या कक्षातील 34 संशयितांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनासोबत स्वाईन फ्ल्यूचे 2 रुग्णही या विशेष कक्षात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 52 वर

दरम्यान, महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 52 वर पोहोचला आहे. आज मुंबई आणि पुण्यात आणखी 3 रुग्ण आढळून आले आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांबाबत माहिती दिली. कोरोना आजार बरा होत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. जे रुग्ण दाखल करण्यात आले आहे, त्यातील काही रुग्णांना डिस्चार्ज दिला जाईल, पण त्यांना घरीच होम क्वारांटाइन राहावे लागेल, अशी दिलासादायक माहिती टोपे यांनी दिली.

मात्र, महाराष्ट्रात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबई, पिंपरी आणि पुण्यात आणखी 3 रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या ही 52 वर पोहोचली आहे, असंही टोपे यांनी सांगितलं.

राज्यातील 4 शहरं बंद करण्याची घोषणा

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबई, पुणे आणि महानगरातील सर्व खासगी कार्यालयं बंद राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. राज्यात सर्व दुकानं आणि व्यापार बंद राहतील पण जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, 'सर्वत्र एकाच खबरदारीचा उपाय सांगितला जात आहे म्हणजे घरातच राहा. मी काल या लढ्याला युद्धाची उपमा दिली आहे. जगण्यासाठी आपल्याला घरात थांबण्याची वेळ आली आहे. अनेकांनी मदतीला सुरुवात केली आहे. दिग्गजांनी आपले काम थांबवून यामध्ये आम्हाला मदत केली आहे. चित्रपटसृष्टीतले, क्रीडा क्षेत्रातले सर्वच पुढे आले आहेत.'

पुढचे 15-20 दिवस अत्यंत महत्वाचे आहे. संसर्ग टाळणे महत्वाचे आहे. काही गोष्टी आपल्या काळजीसाठी घेत आहोत. आपले सहकार्य असू द्या. अनेकांनी सल्ले दिले आहेत की बसेस, रेल्वे बंद करा पण अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांची ने आण कशी करणार ? मनपा कर्मचारी, वाहनचालक काय करणार तूर्त या सेवा बंद न करता सरकारी कार्यालयांत 25 टक्के कर्मचारीच कामावर बोलावणार. यापूर्वी ५० टक्के कर्मचाऱ्यांचा निर्णय घेतला होता, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

तसंच, बँका सुरूच राहतील. खास करून मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर या मोठ्या शहरांत सर्व कार्यालये, दुकाने बंद होतील. यातून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहे. यात अन्नधान्य, दुध, औषधी यांचा समावेश आहे. या शहरांमध्ये कुणाला काही संभ्रम असेल तर संबंधित जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी बोलू शकतात, असं आवाहनही त्यांनी केलं.

First published: March 20, 2020, 3:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या