अहमदनगर, 03 ऑक्टोबर : कोरोनाची (corona) लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा, मंदिरं खुली करण्यात आली आहे. राज्यभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही आता आटोक्यात आली आहे. पण, अहमदनगर (Ahmednagar ) जिल्ह्यातील काही गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे 61 गावांमध्ये लॉकडाउन (lockdown in 61 villages) लावण्यात आला आहे.
अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी लॉकडाऊन लावण्याबाबत आदेश दिले आहे. जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे मेडिकल दवाखाना वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
मालकाने दिला नाही पगार, नोकराने दुचाकी पळवली अन् चौकात जाळली, पुण्यातला VIDEO
61 गावांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावांचा यात समावेश आला आहे. संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक 24 गावांचा समावेश. आहे. उद्या 4 ऑक्टोबरपासून ते 13 ऑक्टोबरपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे.
लहान मुलांना लवकरच लसीकरण
दरम्यान, कोरोना व्हायरसविरूद्धच्या (Coronavirus) युद्धात, आतापर्यंत लसीपासून वंचित राहिलेल्या लहान मुलांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ (Bharati Vidyapeeth Medical College Hospital) वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कोव्होव्हॅक्स (Covovax) लसीच्या 2/3 टप्प्याची ट्रायल सुरू झाली आहे.
सध्या ही ट्रायल 7 ते 11 वर्षे वयाच्या मुलांवर केली जात आहे. दिल्लीतही, जामिया हमदर्द इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्चमध्ये कोव्होव्हॅक्सच्या दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी स्वयंसेवकांची भरती सुरू झाली आहे.
भारतात मुलांवर कोविड विरूद्ध लसीच्या ट्रायलची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यात सहभागी होण्याचं वय 2 ते 17 वर्षे आहे. पुण्यात सुरू झालेल्या ट्रायल दरम्यान, मुलांना 21 दिवसांच्या अंतराने दोन डोस दिले जातील. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने भारतात आणलेल्या नोवोव्हॅक्स लसीची भारतीय आवृत्ती कोव्होव्हॅक्स आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.