मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आमच्याच नेत्यांकडून संजय राठोडांना संपवण्याचा कट, भाजप नेत्याने दिला राजीनामा

आमच्याच नेत्यांकडून संजय राठोडांना संपवण्याचा कट, भाजप नेत्याने दिला राजीनामा

 चंद्रकांत पाटील यांनी आपला राजीनामा स्वीकारावा अशी मागणीही त्यांनी केली.

चंद्रकांत पाटील यांनी आपला राजीनामा स्वीकारावा अशी मागणीही त्यांनी केली.

चंद्रकांत पाटील यांनी आपला राजीनामा स्वीकारावा अशी मागणीही त्यांनी केली.

  • Published by:  sachin Salve
बीड, 17 फेब्रुवारी : पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan case ) प्रकरणामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. एकीकडे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Ratod) यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे तर दुसरीकडे त्यांच्या समर्थनार्थ अनेक जण समोर येत आहे. बीडमध्ये भाजपच्या सरपंचाने राजीनामा देत संजय राठोड यांना पाठिंबा दिला आहे. दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, बीड जिल्ह्यातील अंबोजागाई तालुक्यातील काळवटी तांडा येथील सरपंच कमल नाथराव यांनी भाजपवरच गंभीर आरोप करत राजीनामा दिला आहे. भाजपचे अनेक नेते आणि वरिष्ठ मंडळी ही ओबीसी आणि बंजारा समाजातील उच्चपदस्थ संजय राठोड यांना संपवण्याचा कट रचला जात आहे. त्यामुळे आपण भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा देत आहे, असं नाथराव यांनी जाहीर केले आहे. कमल नाथराव यांनी आपल्या पदाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवला आहे. चंद्रकांत पाटील यांनी आपला राजीनामा स्वीकारावा अशी मागणीही त्यांनी केली. भाजपच्या नेत्यानेच ऑडिओ क्लिप केल्या व्हायरल गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणात तब्बल 12 ऑडिओ क्लीप समोर आल्या आहेत. या ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून व्हायरल झाल्या आहेत. त्यातून या क्लीप नेमक्या कशा बाहेर आल्या याबाबत विचारणा केली जात आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळीच भाजपच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने अरूण राठोडकडून या ऑडिओ क्लीप काढून घेतल्याचं समोर येत आहे. तसेच त्याचवेळी त्यांच्या फोटो आयडीचे फोटो काढून घेतल्याचं सांगितलं जात आहे. पण या प्रकरणी आता दबाव एवढा वाढू लागला आहे. याशिवाय ज्या कार्यकर्त्याने या क्लीप अरूण राठोडकडून घेतल्या तोदेखील आता माध्यमांसमोर येण्याचं टाळत आहे संजय राठोड यांनी राजीनामा देण्याची चर्चा दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्वीट करून संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा दावा केला. 'संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीवर पाठवलेला राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द करावा. कारण एकाने 'मारल्यासारख करायचं, दुसऱ्याने रडल्यासारख करायचं' असं होता कामा नये. तसेच राजीनामा दिल्यानंतर निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी' अशी मागणीही दरेकर यांनी केली. परंतु, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण झाल्यावरच पुढील कारवाई करण्यात येईल, असं सेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 'तो' आवाज माझ्या मुलाचा नाही, अरुणच्या आईचा खुलासा जा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संशयित अरुण राठोड याचं कुटुंब चार दिवसानंतर गावात आलं आहे. मात्र, त्यांच्यासोबत अरुण आलेला नाही. तो अजूनही गायबच आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अरुणच्या घरी लाखो रुपयांची चोरी झाली आहे. पूजा चव्हाणचा मित्र अरुण राठोड हा बीड जिल्ह्यातील परळीच्या धारावती तांडा येथे राहतो. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्हायरल क्लिपमुळे अरुणचं नाव आल्यानंतर त्याच्या घराला गेल्या काही दिवसांपासून कुलूप लावण्यात आलेलं होतं. या विषयी अरुणची आई मीराबाई सुभाष राठोड यांनी याबाबत खुलासा केला असून मीराबाई यांनी त्या ऑडिओ क्लिप मधील संभाषण हे अरुण राठोड व कथित मंत्री यांचे नसल्याच्या दावा या वेळी केला असून सध्या अरुण कुठे आहे हे त्याच्या आईला देखील माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.
First published:

Tags: BJP, Crime news, Maharashtra, Political tension, Pooja chavhan, Sanjay rathod, Suicide

पुढील बातम्या