मुंबई, 21 जून: मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik's letter) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी 'भाजपशी हात जुळवून घ्यावे, भविष्यात तेच चांगले राहिल' अशी विनंती केल्यामुळे सेनेत खळबळ उडाली. या पत्रामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. तसंच अनेक राजकीय वरिष्ठांच्या प्रतिक्रिया यावर उमटू लागल्या. दरम्यान आज पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. तिन्ही पक्ष मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
आम्ही सर्व, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मुख्यमंत्री यांच्या पाठिशी आहोत. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहे. या सरकारची 5 वर्षांची वचनबद्धता आहे. आम्ही 5 वर्ष पूर्ण करु, असं ठामपणे संजय राऊत यांनी आज म्हटलं आहे.
Shiv Sena, Congress & NCP stand united, committed to run govt for 5 yrs. Outsiders who want to form govt & are restless after losing power may try, but govt will continue. Attempts may be made to create cracks b/w Congress, NCP &Shiv Sena but it won't work: Sanjay Raut, Shiv Sena pic.twitter.com/o2AlJSz9gh
— ANI (@ANI) June 21, 2021
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेना काम करत आहे. शिवसेनेला गटबाजीनं पोखरलेलं नसल्याचं म्हणत शिवसेनेत फक्त बाळासाहेब ठाकरेंचा एकच गट, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिलेदार आहोत, हेही सांगायला राऊत विसरले नाहीत.
महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. राज्य सरकार 5 वर्ष चालणार असून ही तिन्ही पक्षांची कमिटमेंट आहे. तिन्ही पक्षांमधील समन्वय देशासाठी आदर्श असल्याचं ते म्हणालेत. तसचं कॉमन मिनिमम प्रोग्राम हा या सरकारचा पाया असल्याचं राऊत म्हणालेत.
हेही वाचा- महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, कोरोनासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट
आमच्यामध्ये मतभेद निर्माण करण्यास कोणीही यशस्वी होणार नाही. दबाव डावपेच घडताहेत. ते सीबीआय आणि ईडी वापर करतात. मात्र ते महाविकास आघाडीत फूट पाडण्यात यशस्वी होणार नाहीत. ही त्यांची निराशा असल्याचं म्हणत राऊतांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
तसंच प्रताप सरनाईक आमचे आमदार आहे. आज सीबीआय आणि ईडी त्यांच्या मागे आहे. त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे. आमचा पक्ष आणि मुख्यमंत्री प्रत्येकजण त्याच्या पाठीशी उभे आहोत, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pratap sarnaik, Sanjay raut