Home /News /maharashtra /

मोठी बातमी! महाराष्ट्र काँग्रेसमध्ये फेरबदलाचे संकेत; आमदारांच्या नाराजीनंतर मोठा निर्णय

मोठी बातमी! महाराष्ट्र काँग्रेसमध्ये फेरबदलाचे संकेत; आमदारांच्या नाराजीनंतर मोठा निर्णय

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलाचे संकेत असल्याचं समोर येत आहे. राज्यातील काँग्रेसमध्ये लवकरच मोठा फेरबद्दल होणार असल्याचं सांगितलं जात आहे

    नवी दिल्ली 01 एप्रिल : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस (Congress) नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. राज्यातील काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी वेळोवेळी त्यांची नाराजी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींकडे (Sonia Gandhi) बोलून दाखवली आहे. अशात आता काँग्रेसचे तब्बल 25आमदार नाराज असल्याचंही समोर येत होतं. या आमदारांनी सोनिया गांधींना पत्र लिहून भेटीसाठी वेळ देण्याची मागणी केली होती. यावरुन पुन्हा चर्चांना उधाण आलेलं आहे. अशात आता एक मोठी बातमी समोर आली आहे. 'भाजपने ED ला चिल्लर बनवलंय; तपास यंत्रणांचा गैरवापर करून...', सतीश उकेंच्या अटकेवरुन नाना पटोलेंचा घणाघात महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलाचे संकेत असल्याचं समोर येत आहे. राज्यातील काँग्रेसमध्ये लवकरच मोठा फेरबद्दल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज्याचे सहप्रभारी बी एम संदीप यांना करण्यात कार्यमुक्त करण्यात आलं आहे. तर, काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्यावर टांगती तलवार आहे. विरोधात झेंडा हातात घेतलेल्या जी 23 गटाच्या दबावानंतर पाच ते सहा प्रभारी बदलण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील यांच्याबद्दल देखील अनेक तक्रारी गेल्या असल्याचं समोर आलं आहे. काँग्रेसचे 25 आमदार सरकारवर नाराज आहे. आपल्या व्यथा मांडण्यासाठी सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. याबद्दल एक पत्रही सोनिया गांधींना लिहिण्यात आले आहे, असं वृत्त हिंदूस्तान टाईम्सने दिले होते. इकोनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारमधील काही मंत्री आपलं म्हणणं ऐकत नाही. काँग्रेसचे मंत्री सुद्धा आपलं ऐकत नाही. जर मंत्री आमदारांच्या मतदारसंघातील समस्येबाबत ऐकणार नसतील तर भविष्यात मतदारसंघात कसं काम करायचे? असा सवालच आमदारांनी उपस्थितीत केला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Sonia gandhi, State government

    पुढील बातम्या