RSS चे कौतुक करत असलेले योगेश सोमण यांचे VIDEO काँग्रेसनं केले VIRAL

RSS चे कौतुक करत असलेले योगेश सोमण यांचे VIDEO काँग्रेसनं केले VIRAL

एक महिन्यापूर्वी योगेश सोमण यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. आता मुंबई विद्यापीठाने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जानेवारी : मुंबई विद्यापीठातील थिएटर ऑफ आर्टसचे संचालक योगेश सोमण यांना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करणं भोवलं आहे. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून विद्यापीठाने कारवाई केली आहे. योगेश सोमण यांनी एक महिन्यापूर्वी व्हिडिओ पोस्ट केला होता. यात त्यांनी राहुल गांधी आणि देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली होती. राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या टीकेनंतर सोमण यांनी व्हिडिओ शेअर केला होता.

दरम्यान, आता हा वाद आणखी वाढला असून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी सोमण यांचे दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये प्रणव मुखर्जी यांना जेव्हा संघाच्या व्यासपीठावर बोलण्यासाठी आमंत्रण दिलं होतं तेव्हाचा एक व्हिडिओ आहे.

त्याशिवाय संघावर आरोप करणाऱ्यांवर टीका करणारा एक व्हिडिओ आहे. यामध्ये सोमण यांनी हातात कोळसा घेतला असून त्याला कागदाच्या पट्टीने मारत संघावर आरोप करण्याचा जाब विचारला आहे. संघाच्या शाखा आणि त्यांचे काम याबद्दल सोमण यांनी या व्हिडिओतून सांगितलं आहे.

सचिन सावंत यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की,  योगेश सोमण यांची मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या संचालकपदी केवळ संघाशी जवळीक म्हणून नेमणूक झाली व भाजप नेत्यांचे प्रेम का ऊतू गेले हे या व्हिडिओतून कळेल. शिकवण्याचा अनुभव नाही, राज्यशास्त्राचा पदवीधर आहे. कोळसे पाटील यांच्या विरोधातील भावना हीनच नाही का? असा प्रश्नही सचिन सावंत यांनी विचारला आहे.

वाचा : मंडपाऐवजी पोहचली ICUमध्ये, लग्नाच्या 3 दिवस आधी मुलीला डिझेल ओतून पेटवलं

गेल्या महिन्याभरात सोमण यांच्यावर कारवाई झाली नाही. मात्र सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी आंदोलन करत गैरसोय आणि इतर तक्रारी मांडल्या. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. विभागात अनुभव नसलेले शिक्षक, लेक्चरशिवाय अभ्यासक्रम पूर्ण करणे, सोयी-सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या.

वाचा : 'जाणता राजा'वरून राजकारण, उदयनराजे भोसलेंना राष्ट्रवादीने दिले असे प्रत्युत्तर

Published by: Suraj Yadav
First published: January 15, 2020, 1:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading