बीना देवी, बिहार - मशरूम महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिना देवी. मशरूमच्या मशागतीसाठी त्यांना ओळखलं जातं. त्यासोबतच त्या शेळीपालन आणि दूध उत्पादनाचा व्यवसायही करतात. राज्य सरकारकडून त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत. 2500 शेतकऱ्यांना त्यांनी शेतीविषयक प्रशिक्षण दिलं, त्यासाठी त्यांना बिहारच्या मुख्यमंत्र्यांकडून अभिनव किसान पुरस्कार प्रदान करण्यात आला. 20 गावातील महिलांनाही प्रशिक्षण दिलं, त्यासाठी त्यांना नारी सशक्तीकरण पुरस्कार मिळाला आहे. 2019 साली त्यांना बिहार सरकारकडून सर्वोत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कारही देण्यात आला.