जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / किरीट सोमय्यांच्या विरोधात 1 रुपयाचा दावा दाखल करणार, , काँग्रेस नेत्याने पकडली चूक

किरीट सोमय्यांच्या विरोधात 1 रुपयाचा दावा दाखल करणार, , काँग्रेस नेत्याने पकडली चूक

 अमरावती पोलीस आयुक्त यांनी अमरावती जिल्ह्यात शहरात सध्या संचारबंदी लागू असल्याने दौरा स्थगित करावा, असे पत्र पाठवले आहे.

अमरावती पोलीस आयुक्त यांनी अमरावती जिल्ह्यात शहरात सध्या संचारबंदी लागू असल्याने दौरा स्थगित करावा, असे पत्र पाठवले आहे.

किरीट सोमय्या यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीवर बोलताना 20 टक्के काँग्रेसला मिळतो असा धादांत खोटा आरोप करून काँग्रेस पक्षाची बदनामी केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नागपूर, 3 नोव्हेंबर :  भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somiya) महाविकास आघाडी सरकारच्या (mva government) आमदार आणि मंत्र्यांवर आरोप करत असतात. पण ‘सोमय्या हे बिनबुडाचे आरोप करुन नाहक बदनामी करत असतात. सोमय्या यांच्या बेताल व बिनबुडाच्या वक्तव्याप्रकरणी आता त्यांच्याविरोधात कोर्टात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (atul londhe) यांनी दिली. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना  अतुल लोंढे यांनी किरीट सोमय्यांविरोधात दावा दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे. ‘किरीट सोमय्या यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीवर बोलताना वसुलीच्या पैशातील ४० टक्के शिवसेना, ४० टक्के राष्ट्रवादी काँग्रेस व २० टक्के काँग्रेसला मिळतो असा धादांत खोटा आरोप करून काँग्रेस पक्षाची बदनामी केली आहे. सोमय्या यांच्या या बेताल, बिनबुडाच्या आरोपाविरोधात आता त्यांच्या विरोधात कोर्टात तक्रार दाखल करणार असून दोन कवडीचा दावा दाखल करता येत नाही म्हणून 1 रुपयाचा दावा दाखल करणार आहे, अशी माहिती लोंढे यांनी दिली. Diwali 2021 मध्ये तुमच्या नातलगांना गिफ्ट म्हणून द्याल ‘आर्थिक सुरक्षा’ सतत खोट्या आरोपांची राळ उडवून महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम सोमय्या करत आहेत. स्वतःच तपास अधिकारी व स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भात त्यांची असंबंध बडबड सुरू असते. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून या बेताल बडबडण्याला चाप बसला पाहिजे म्हणून दिडदमडीच्या सोमय्यांची जेवढी लायकी आहे तेवढ्याच किंमतीचा म्हणजे एक रुपयाचा दावा दाखल करणार आहे, असंही लोंढे म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात