जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Congress Ashok Chavhan : युतीच्या काळात सीएम शिंदे आमच्यासोबत सरकार स्थापन करणार होते अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

Congress Ashok Chavhan : युतीच्या काळात सीएम शिंदे आमच्यासोबत सरकार स्थापन करणार होते अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

Congress Ashok Chavhan : युतीच्या काळात सीएम शिंदे आमच्यासोबत सरकार स्थापन करणार होते अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

राज्याच्या राजकारणाला आता नवे वळण आले आहे. माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी टाकलेल्या राजकीय गुगलीने एकनाथ शिंदे यांना पेचात टाकले आहे. (Congress Ashok Chavhan)

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 सप्टेंबर : शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर फडणवीस आणि शिंदे यांनी सरकार स्थापन केले. यानंतर मागच्या दोन महिन्यात महाविकास आघाडीतील नेते, भाजप, शिंदे गट असा नवा वाद सुरु झाला आहे. या राजकीय धुमशानात नेते मंडळी जुन्या गोष्टी बाहेर काढत गौप्सस्फोट करत आहेत. दरम्यान राज्याच्या राजकारणाला आता नवे वळण आले आहे. माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी टाकलेल्या राजकीय गुगलीने एकनाथ शिंदे यांना पेचात टाकले आहे.

जाहिरात

माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले कि, राज्यात 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सरकारच्या काळातच युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. तसेच हा प्रस्तान चक्क सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊन आल्याचे बोलले जात आहे. यामुळे अशोक चव्हाण यांच्या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा राजकारण तापणार असल्याचे दिसून येत आहे. मागच्या दोन महिन्यात एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. दरम्यान ते यावर काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे.

हे ही वाचा :  ‘…अन् ती एक गोष्ट केली की शरद पवार पुन्हा सत्तेत येतात’, सुप्रिया सुळेंचा दावा

चव्हाण पुढे म्हणाले  कि, 2019 मध्ये युतीमध्ये निवडणूक लढवून बहुमत मिळालेले असतानाही शिवसेनेने शेवटी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत येऊन सरकार स्थापन केले. या घटनेने राजकीय जाणकारांना आश्चर्याचा धक्का बसला; पण आता भाजपसोबत राहायचे नाही, ही शिवसेनेची भुमीका त्यापूर्वी म्हणजे देवेंंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारच्या काळातच झाली होती.

जाहिरात

काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करू, अशा आशयाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे वरिष्ठनेते ज्यात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. या सर्वांनी माझी, माझ्या मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती, असे चव्हाण यांनी सांगितले.

हे ही वाचा :  राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा मुंबईत, शिवसेना सहभागी होणार?

अशाप्रकारचे सरकार स्थापन करायचे असल्यास तुम्ही आधी शरद पवार यांच्याशी चर्चा करा, असे मी या नेत्यांना सांगितले होते. परंतु, ते पवार यांना पुढे भेटले किंवा नाही, याबाबत मला नंतर काहीही माहिती नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांचे स्वागत नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती केली असून, मी नांदेड जिल्ह्यात त्यांचे स्वागत करतो. नांदेडच्या विकासाचे प्रश्न नव्या पालकमंत्र्यांनी मार्गी लावावेत, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात