मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा', काँग्रेस मंत्र्याने ब्राह्मण समाजावर टीका केल्यानंतर वाद पेटला

'मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा', काँग्रेस मंत्र्याने ब्राह्मण समाजावर टीका केल्यानंतर वाद पेटला

परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेत राऊत यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे.

परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेत राऊत यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे.

परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेत राऊत यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे.

  • Published by:  Akshay Shitole
नागपूर, 14 मार्च : काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या मुद्यांवरून ब्राह्मण समाजाला लक्ष्य केले. ब्राह्मण परदेशातून भारतात आले आणि ते आम्हाला प्रमाणपत्र आणा म्हणून अक्कल शिकवत आहेत, असे वादग्रस्त विधान त्यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात केल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. उत्तर नागपूरच्या इंदोरा मैदानात 8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. राऊत यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना नितीन राऊत यांनी ब्राह्मण समाजाला लक्ष्य केलं. त्यानंतर आता परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेत राऊत यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे. 'नितीन राऊत यांचं वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. मंत्रिपदावर राहणाऱ्या माणसाने असं जातीयद्वेषी वक्तव्य करणं संयुक्तित नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. राऊत यांचं वक्तव्य म्हणजे संविधानातील शपथेचा भंग आहे आणि म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही अपमान आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ,' असा इशारा विश्वजीत देशपांडे यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वीही निर्माण झाला होता वाद एकीकडे काँग्रेस नेते आणि मंत्री नितीन राऊत यांच्या वक्तव्यानंतर आता वाद झाला असताना काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक सुजय डहाके याच्या वक्तव्यानेही वातावरण तापलं होतं. मराठीमध्ये सुरु असलेल्या प्रत्येक मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही? असा प्रश्न सुजय डहाके यानं उपस्थित केला होता. हेही वाचा-'तुमच्यामुळे पक्षाची बदनामी होत आहे', राष्ट्रवादीने प्रदेश उपाध्यक्षाला पक्षातून काढून टाकलं! 'मी स्वत: एका मीटिंगमध्ये होतो, तिथं म्हटलं गेलं की ती गायकवाड लागू बंधूच्या जाहिरातील काम कसं करणार? असं बोललं गेलं,' असा धक्कादायक दावा सुजय डहाके याने केला आहे. 'हा कोण येतो डहाके...याला कसा मिळतो राष्ट्रीय पुरस्कार...याचा अनेकांना राग आहे,' असा आरोपही त्याने केला होता. सुजय डहाके याने मांडलेल्या भूमिकेनंतर वाद निर्माण झाला. अभिनेता शशांक केतकर, सौरभ गोखले आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी या वक्तव्याप्रकरणी सुजय डहाके याच्यावर टीका केली. तर या वादात संभाजी ब्रिगेडनं उडी घेत सुजय डहाकेला पाठिंबा दर्शवला होता.
First published:

Tags: Congress, Nitin raut

पुढील बातम्या