• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • काँग्रेसची अधिकृत घोषणा, विधानपरिषदेच्या एका जागेसाठी उमेदवारी जाहीर, या नावावर शिक्कामोर्तब

काँग्रेसची अधिकृत घोषणा, विधानपरिषदेच्या एका जागेसाठी उमेदवारी जाहीर, या नावावर शिक्कामोर्तब

काँग्रेसनं (Congress) विधानपरिषदेच्या एका जागेसाठी ही उमेदवारी जाहीर केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 15 नोव्हेंबर: काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव (Rajeev Satav) यांच्या पत्नी प्रज्ञा सातव (Pradnya Rajeev Satav) यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने आज याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. काँग्रेसनं (Congress) विधानपरिषदेच्या एका जागेसाठी ही उमेदवारी जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांच्या निधनानं जी जागा रिक्त झाली. त्याच जागेवर प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात आली आहे. जुलै 2024 पर्यंत या विधानपरिषदेची मुदत आहे. जर या जागेवर निवड झाली तर राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या पत्नीकडे जाणार आहे. दुसरीकडे या जागेसाठी जागेसाठी चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, जितेंद्र देहाडे या काँग्रेस नेत्यांच्या नावाचीही चर्चा होती. 29 नोव्हेंबरला विधानपरिषदेच्या या एका जागेसाठी निवडणूक अपेक्षित आहे. 16 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. राज्यसभेचे खासदार असताना राजीव सातव यांचं कोरोनानं निधन झालं. त्यानंतर राजीव सातव यांच्या जागी रजनी पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं. दरम्यान त्या आधी राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची राज्यसभेवर वर्णी लागेल अशी चर्चा होती. मात्र, प्रज्ञा सातव यांना राज्यसभेचं तिकीट नाकारण्यात आलं. त्यावेळी त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. प्रज्ञा सातव सक्रिय राजीव सातव यांचं निधन झाल्यावर प्रज्ञा सातव आपल्या मुलाला घेऊन काही महिन्यातच गांधी कुटुंबियांच्या भेटीला गेल्या होत्या. त्यावेळी मुलाचा नुकताच निकाल लागला होत. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यासह प्रियंका गांधींची प्रत्यक्ष भेट घेतली होती. गांधी कुटुंबियांनीही सातव यांच्या मुलाचं कौतूक केलं. त्यानंतर त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही भेट घेतली होती. सध्या प्रज्ञा सातव काँग्रेसच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातही सहभागी होत असतात. हिंगोली- कळमनुरीत त्या सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते किंवा महिलांच्या विविध कार्यक्रमांना त्या हजेरी लावत असतात. हेही वाचा- औरंगाबाद: एकाच दिवशी तरुण-तरुणीनं संपवलं जीवन; गावच्या उपसरपंचावरच गंभीर आरोप  भाजपचा उमेदवारही निश्चित दरम्यान या जागेसाठी भाजपकडून औरंगाबाद भाजप अध्यक्ष संजय किणेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आम्ही ही निवडणूक लढवणार असल्याचं चंद्रकात पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: