मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी होणार मोठा खुलासा? 9 जणांची समिती करणार चौकशी

दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी होणार मोठा खुलासा? 9 जणांची समिती करणार चौकशी

Amaravati Latest Update: अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील RFO दीपाली चव्हाण (Deepali Chavhan Suicide case) यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. आता याप्रकरणी चौकशीसाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.

पुढे वाचा ...

अमरावती, 02 एप्रिल: गेल्या काही दिवसांपासून दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील RFO दीपाली चव्हाण (Deepali Chavhan Suicide case) यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये  DFO विनोद  शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत.

सरकारवरचा वाढता दबाब लक्षात घेता आता, याप्रकरणी प्रधान मुख्य वनसंरक्षक जी साईप्रकाश यांनी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी तपास समितीचं गठण (Committee formed to probe Deepali Chavan suicide case) केलं आहे. या समितीमध्ये नऊ जणांचा समावेश आहे. ज्यामध्ये वरिष्ठ  IFS दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक  एम के राव हे या समितीचे अध्यक्ष तर अमरावती मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित नऊ जणांच्या समितीमध्ये सध्या चार महिला असून आणखी एका महिलेची NGO मधून नियुक्ती केली जाणार आहे.

अशी असणार समिती

1- एम के राव प्रधान मुख्य वनसंरक्षक अध्यक्ष.

2- विकास गुप्ता अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर.

3- मीरा त्रिवेदी मुख्य महाव्यवस्थापक वन विकास महामंडळ नागपूर.

4- पियुषा जगताप विभागीय वन अधिकारी मेळघाट

5- श्रीमती ज्योती पवार सहाय्यक वनसंरक्षक,अमरावती

6- श्रीमती कोकाटे, RFO अमरावती.

7- किशोर मिस्त्रीकोटकर, सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी.

8- प्रवीण चव्हाण मुख्य वनसंरक्षक, प्रादेशिक अमरावती - सदस्य सचिव.

9 - एक सदस्य NGO मधून घेणार आहेत.

हे ही वाचा- 'DFO ला फाशी द्या', महिला अधिकाऱ्याच्या आत्महत्येनंतर आईची मागणी; धक्कादायक सुसाइड नोट आला समोर

तत्पूर्वी, दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी DFO विनोद शिवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे. याप्रकरणी दीपाली चव्हाण यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही, त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने वनविभागाने श्रीनिवास रेड्डी यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विनोद शिव कुमार याला सेवेतून बडतर्फ करण्यात यावं, तसेच श्रीनिवास रेड्डी यांनाही याप्रकरणी सह आरोपी करावं, अशी मागणी वनपाल वनरक्षक रेंज फॉरेस्ट ऑफिसर असोसिएशन व भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.

First published:

Tags: Amravati, Suicide case