मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोरोनाची दुसरी लाट पूर्णतः कमी असेल त्याच ठिकाणी कॉलेज सुरू होणार, उदय सामंत यांची माहिती

कोरोनाची दुसरी लाट पूर्णतः कमी असेल त्याच ठिकाणी कॉलेज सुरू होणार, उदय सामंत यांची माहिती

राज्यात कोरोनाची (Maharashtra Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात आली आहे. त्यामुळे राज्यात कॉलेज (College) कधी सुरु होणार असा प्रश्न सुरु झाला. यावर आता स्वतः उदय सामंत (Uday Samant) यांनी माहिती दिली आहे.

राज्यात कोरोनाची (Maharashtra Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात आली आहे. त्यामुळे राज्यात कॉलेज (College) कधी सुरु होणार असा प्रश्न सुरु झाला. यावर आता स्वतः उदय सामंत (Uday Samant) यांनी माहिती दिली आहे.

राज्यात कोरोनाची (Maharashtra Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात आली आहे. त्यामुळे राज्यात कॉलेज (College) कधी सुरु होणार असा प्रश्न सुरु झाला. यावर आता स्वतः उदय सामंत (Uday Samant) यांनी माहिती दिली आहे.

बीड, 13 ऑगस्ट: ज्या ठिकाणी कोविडची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) पूर्णतः कमी झाली त्या ठिकाणी कॉलेज (College) सुरू करण्याचा विचार करत असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली. ते बीडमध्ये (Beed) पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, कॉलेज कधी सुरू होणार आहेत की नाही हे पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. त्यामध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सूचना केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना म्हटलं की, मिळणाऱ्या लसीच्या डोस पैकी 20 ते 25 टक्के लसी फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा. जर दोन्ही डोस पूर्ण झाले तरच महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करणे शक्य होईल

महाविद्यालय सुरू करत असताना विद्यार्थ्यांच आरोग्य आमच्या प्राध्यापकांचा आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आरोग्य सुस्थितीत ठेवूनच निर्णय घेणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.

बीडमध्ये संख्या लक्षणीय आहे. सिंधुदुर्ग,सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी देखील कोरोनाचे रुग्ण निघत आहेत म्हणून त्या ठिकाणी ऑनलाईनच राहतील. इतर ठिकाणी टप्प्याटप्प्याने कॉलेज सुरू करण्यासाठी विचाराधीन आहोत असं मत उदय सामंत यांनी व्यक्त केले.

ठरलं तर मग; अशी असेल नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा

ज्या ठिकाणी प्रशासनाला यश आलेले आहे कोविडची दुसरी लाट पूर्णतः कमी झाली. त्या ठिकाणी कॉलेज सुरू करण्याचा विचार आम्ही करत आहोत, असं ते म्हणाले.

स्कॉलरशिप घोटाळ्याच्या प्रकरणात काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काही ठिकाणी विद्यापीठाने नेमलेल्या समितीचे अहवाल पेंडीग आहे. माझ्या विभागाकडे असलेल्या छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्तीचे 311 कोटी 24 तासाच्या आत मी रिलीज केले आहेत, असंही ते म्हणालेत.

मुंबईत ड्रग्ज तस्करांकडून NCB च्या अधिकाऱ्यांवर गोळीबार; 5 अधिकारी जखमी, म्होरक्या अटकेत

रानडे इन्स्टिट्यूट ही जगातली अशी संस्था आहे की ज्या संस्थेविषयी सर्वांना आत्मीयता आहे. पत्रकारांनी याविषयी विरोध दर्शविला आहे. मात्र रानडे इन्स्टिट्यूट कोणी जर हलवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते होणार नाही. मी उद्याचं रानडे इन्स्टिट्यूटला भेट देतोय. जो कोणी बिल्डरला देण्याचा निर्णय घेत असेल तर तो मंत्री म्हणून आम्ही हाणून पाडू, असा इशारा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलाय..

First published:

Tags: Beed, Colleges closed