बीड, 28 मे: मागील काही दिवसांपासून कोविड रुग्णालयांमध्ये (Covid Center) महिलांविरोधी होणाऱ्या गुन्ह्यांत (Crime against women) वाढ झाली आहे. अलीकडेच औरंगाबादमधील एका कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेचा रुग्णवाहिका चालकाने विनयभंग (Sexual molestation) केला होता. ही घटना ताजी असताना अशाच प्रकारची दुसरी घटना बीडमधील कोविड सेंटरमधून समोर आली आहे. येथील एका नर्सचा तिच्याच सहकाऱ्याकडून वियनभंग (Sexual molestation of nurse) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित नर्सने आरोपी सहकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित आरोपी युवकाचं नाव अर्जुन अनंत फड असून तो परळी तालुक्यातील दौंडवाडी येथील रहिवासी आहे. आरोपी आणि पीडित नर्स मागील काही दिवसांपासून एकाच कोविड रुग्णालयात काम करत आहे. आरोपी फड हा गेल्या दीड महिन्यापासून पीडित नर्सचा पाठलाग करत तिच्यावर पाळत ठेवत होता. गेल्या दीड महिन्यापासून आरोपी अर्जुन फड रात्री अपरात्री पीडितेच्या रुमचा दरवाजा वाजवून पळ काढत होता. त्यामुळे घाबरलेली नर्स दरवाजा नेमकं कोण वाजवतंय यासाठी त्यांनी पाळत ठेवली. यावेळी रुग्णालयात सोबत काम करणारा अर्जुन दरवाजा ठोठावताना दिसला.
हे वाचा-विवाहितेची सॅनिटायझर पिऊन आत्महत्या, मृत्यूनंतर पतीने बनवला खोटा कोरोना अहवाल
हे प्रकरण केवळ एवढ्यावरचं थांबलं नाही. तर आरोपी अर्जुनने मंगळवारी (25 मे रोजी) पीडित नर्सच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला केला. याप्रकरणी पीडित नर्सने अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नसून या घटनेचा तपास केला जात आहे. चौकशी केल्यानंतर अटक केलं जाईल अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.
हे वाचा-गँग रेप VIDEO मधल्या त्या नराधमांना अखेर अटक; देशभरातले पोलीस होते मागे
यापूर्वी राज्यातील विविध कोविड रुग्णालयात महिला रुग्णांवर अत्याचार करण्याचे प्रयत्न झाले आहेत. यामुळेच कोविड रुग्णालयात इमरजेन्सी अलार्म लावण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. पण अद्याप ही सुविधा राज्यातील कोविड रुग्णालयात बसवण्यात आली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed news, Covid centre, Sexual harassment