रत्नागिरी, 24 सप्टेंबर : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे समुद्र किनाऱ्यावर संशयीत बोट सापडल्याची माहिती पसरली होती. दरम्यान याबाबत मच्छीमार आणि स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. यामुळे प्रशासन सतर्क होऊन त्याची माहिती घेतली. याबाबत तटरक्षक दलाने या जहाजाविषयी माहिती दिली आहे. यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. विजयदुर्ग समुद्र किनाऱ्यावर पार्थ जहाजाच्या लाईफ क्राफ्टचा तो भाग असल्याची माहिती दापोली तटरक्षक दलाने दिली आहे.
दापोली किनाऱ्यावर काही संशयास्पद वस्तू सापडल्याची माहिती स्थानिक आणि मच्छामारांनी मिळाली होती. यानंतर स्थानिकांसह मच्छीमारांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. यानंतर तटरक्षक दलाने याची खात्री केल्यानंतर नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले.
हे ही वाचा : गाडीतून खाली उतरले अन्..; चहामुळे वाचला संपूर्ण कुटुंबाचा जीव, नाशिकमधील थरारक घटना
विजयदुर्ग किल्यावरील लाईफ क्राफ्टचा तो भाग असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान याच लाईफ क्राफ्टच्या माध्यमातून 19 जणांची सुटका करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रशासनाने कोणतीही अफवा अथवा चुकीची माहिती न पसरवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मालवणमध्ये नौका उलटून एकजण बेपत्ता
मच्छीमारी करून किनार्यावर परतत असताना समुद्राच्या अजस्त्र लाटांच्या तडाख्यात ‘मोरेश्वर कृपा’ नौका उलटली. सोमवारी सकाळी मालवण-देवबाग समुद्र किनारी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत देवबाग येथील विष्णू बळीराम राऊळ (55) हे मच्छीमार बेपत्ता झाले तर गौरव राऊळ व गंगेश राऊळ या दोघा मच्छीमारांना वाचविण्यात यश आले. या घटनेची माहिती समजताच प्रशासकीय यंत्रणनेने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
देवबाग संगम खाडी किनारा येथून सोमवारी सकाळी विष्णू बळीराम राऊळ (वय 55), गौरव विष्णू राऊळ (20), गंगेश उत्तम राऊळ (15, सर्व रा. देवबाग) हे मोरेश्वर कृपा वेतोबा प्रसाद या छोट्या मासेमारी नौकेने मासेमारीसाठी गेले होते. मासेमारी करून परत येत असताना अचानक समुद्रातील अजस्त्र लाटांच्या तडाख्यात सापडून ही मच्छीमारी नौका उलटली. यामुळे नौकेवरील तीनही मच्छीमार पाण्यात फेकले गेले. यात गौरव व गंगेश यांनी पोहत किनारा गाठल्याने ते बचावले. मात्र विष्णू राऊळ हे समुद्रात बुडून बेपत्ता झाले.
हे ही वाचा : Mumbai : कोरोनात गेली इंजिनिअरची नोकरी, आता फुड स्टॉलमधून करतोय लाखोंची कमाई! Video
घटनेची माहिती मिळताच पोलिस व महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. प्रांताधिकारी वंदना खरमळे, पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, तहसीलदार अजय पाटणे, पोलिस निरीक्षक विजय यादव, पोलिस पाटील भानुदास येरागी अन्य अधिकारी तसेच आजी माजी लोकप्रतिनिधी, मच्छीमार नेते उपस्थित होते.
पोलिस, महसूल, सागर रक्षक दलाचे सदस्य, मच्छीमार व ग्रामस्थ यांच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या विष्णू राऊळ यांचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता, अशी माहिती मालवण पोलिस निरीक्षक विजय यादव यांच्या वतीने देण्यात आली आहे.