जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिंदे गटात वेगवान हालचाली, मुख्यमंत्र्यांनी बोलावली 50 आमदारांची महत्त्वाची बैठक

शिंदे गटात वेगवान हालचाली, मुख्यमंत्र्यांनी बोलावली 50 आमदारांची महत्त्वाची बैठक

शिंदे गटात वेगवान हालचाली, मुख्यमंत्र्यांनी बोलावली 50 आमदारांची महत्त्वाची बैठक

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे, तर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लवकरच राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) होईल, असं सांगितलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 ऑगस्ट : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे, तर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लवकरच राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) होईल, असं सांगितलं आहे. एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी रविवारपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं सांगितलं आहे, त्यातच आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उद्या संध्याकाळी 7 वाजता 50 आमदारांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला शिंदे समर्थक आमदारांच्या मतदारसंघातील वेगवेगळ्या विकास कामांसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीचं ठिकाण उद्याच ठरणार आहे. या बैठकीत मंत्रिमंडळाबाबत काही चर्चा होते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख मुख्यमंत्री राज्यपालांना कळवतील, तेव्हाच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मला ज्याप्रमाणे वरिष्ठ सांगतात, ती माहिती मी देतो. मी कुठलाही निर्णय घेत नाही, त्याच धर्तीवर चार दिवसांमध्ये विस्तार होईल, असं सांगितल्याचं केसरकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे आज त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द करून दिल्लीला रवाना झाले आहेत. याबाबतही केसरकर यांना विचारण्यात आलं. ज्या अर्थी दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत, त्याअर्थी यादी फायनल झाल्याचं म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तब्येत बरी नसल्यामुळे त्यांचे कार्यक्रम रद्द केले आहेत. सततच्या दौऱ्यामुळे एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवत आहे, त्यामुळे डॉक्टरांनी शिंदेंना सक्त आरामाचा सल्ला दिला आहे. कोणाला संधी? मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी समोर आली आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, नितेश राणे, बबनराव लोणीकर यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाकडून शंभूराजे देसाई, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर यांची नावं समोर आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात