मुंबई, 14 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm Eknath Shinde) यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आजच्या कॅबिनेटमिटींगमध्ये घेतला आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. झाल्या मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना कोणतीही अट न घालता 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा केली. दरम्यान त्यांनी कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबीटकर यांनी केलेल्या मागणीवरून हा निर्णय आम्ही घेत असल्याचेही सांगितले.
नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे 50 हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नव्हते. दरम्यान याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही. याबाबतचा शासन निर्णय पुढच्या कॅबीनेट मिटींगमध्ये काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याबाबत खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवेदन देऊन लाखों शेतकरी या अनुदानापासून वंचित राहत असल्याचे माझ्या निदर्शनास आणून दिल्यााचे सांगितले होते.
हे ही वाचा : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
या निवेदनाच्या अनुषंगाने जाचक अटी रद्द करून राज्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
आमदार प्रकाश आबिटकर आणि खासदार धैर्यशील माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने लावलेले नियम जाचक आहेत. 2018-19 मध्ये अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई दिली आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील लाखों शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.
हे ही वाचा : BREAKING : 'मातोश्री'चे महत्त्व झाले कमी? भाजपचा आणखी एक उद्धव ठाकरेंना धक्का, मुर्मू यांचा मोठा निर्णय
याशिवाय या योजनेत 2017-18, 2018-19, 2019-20 या कालावधीत बँक किंवा संस्थांकडून घेतलेले कर्ज पात्र आहे. या निकाशत राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा बँका यांचे आर्थिक वर्ष वेगेवेगळे असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार नाही असे म्हटले आहे.
राजू शेट्टींचा आक्रोश मोर्चा कोल्हापुरात
मुख्यमंत्री महोदय नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांच्या खात्यावर १ जुलै पासून पैसे जमा होणार होते त्याला स्थगिती का दिली ? असच ट्वीट आधीच्या मुख्यमंत्र्यांनी पुरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी केले होते पण अखेर भ्रमनिरासच झाला शेतक-याचा विश्वास बसण्यासाठी ट्वीट करण्यापेक्षा शासन निर्णय करा व कधीपासून पैसे जमा करणार त्याची तारीखही जाहीर करा असे राजू शेट्टी म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agricultural law, Eknath Shinde, Farmer, Raju Shetti (Politician), Shiv Sena (Political Party)