मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुंबई महापालिका, बेस्टच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, मुख्यमंत्र्यांकडून बोनसची घोषणा

मुंबई महापालिका, बेस्टच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, मुख्यमंत्र्यांकडून बोनसची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांच्यासाठी खूशखबर दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांच्यासाठी खूशखबर दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांच्यासाठी खूशखबर दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 29 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांच्यासाठी खूशखबर दिली आहे. दिवाळीमध्ये या कर्मचाऱ्यांना 22,500 रुपये बोनस मिळणार आहे. तर आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी बोनस म्हणून दिला जाणार आहे.

मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसंच अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोनस बाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीत बोनसबाबतचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयामुळे मुंबई महापालिकेचे 93 हजार आणि बेस्टचे 29 हजार कर्मचाऱ्यांसह, शिक्षक, आरोग्य सेविका यांना दिवाळी बोनस मिळणार आहे.

'कोविडच्या बिकट परिस्थितीत मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केलं आहे. विकास कामांवर खर्च केलाच पाहिजे पण चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे' असे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना आनंदात दिवाळी साजरी करा, पण सगळ्यांनी मुंबईकरांसाठी मनापासून काम करा,' असं आवाहन केलं.

या बैठकीला खासदार राहुल शेवाळे, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, माजी आमदार किरण पावसकर, महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, संदीप देशपांडे, शशांक राव, संतोष धुरी, उत्तम गाडे, अशोक जाधव यांच्यासह पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

'मुंबई महापालिकेशी निगडीत विकास कामांतील तसेच कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी या प्राधान्याने सोडविल्या जातील. सगळ्यांनी आता मुंबईकरांसाठी मनापासून काम केले पाहिजे. रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामे नागरिकांच्या मनासारखी दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी अभियंत्यांपासून ते सर्वांनीच दक्षता घ्यावी,' असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या बैठकीत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठीची 'श्रमसाफल्य' आणि 'आश्रय' या योजनेतील घरे उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. विविध विकास यंत्रणांना सोबत घेऊन अशी घरे मोठ्या संख्येने उपलब्ध व्हावीत, यासाठी स्वतंत्र समन्वय बैठक घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

First published:

Tags: BMC, Cm eknath shinde