मुंबई, 24 डिसेंबर: कोरोना व्हायरसचा (Corona Virus) नवीन व्हेरिएंट (New Variant) ओमायक्रॉननं (Omicron) सर्वांचीच चिंता वाढवली आहे. राज्यात ओमायक्रॉनचे रुग्णसंख्याही वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात येत्या ख्रिसमस (Christmas) तसंच नवीन वर्षानिमित्त (New Year) नवीन निर्बंध लागण्याची शक्यता आहे. राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर गुरुवारी टास्क फोर्स (Task Force) सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मार्गदर्शन केलं.
या बैठकीत टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री यांच्यात नव्या निर्बंधावर चर्चा करण्यात आली आहे. ख्रिसमस, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन अशावेळी कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीनं बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. याबाबत उद्या 24 रोजी म्हणजेच नवी नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.
असे असू शकतात नवे निर्बंध
गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीत इतर राज्यांनी लावलेल्या निर्बंधांवर तसंच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवरही चर्चा केली गेली. या बैठकीस मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ अजित देसाई, डॉ राहुल पंडित उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.