चिपळूण, 09 फेब्रुवारी : चिपळूणमधील कुशिवडे गावात गावठी बॉम्बचा साठा सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधपथकाने 18 बॉम्ब जप्त केले आहे. रानटी डुक्कराच्या शिकारीसाठी गावठी बॉम्बचा सापळा रचला होता.
चिपळूण तालुक्यातील कुशवीडे गावी पोस्ताचा माळ येथिल जंगल भागात डुक्कराच्या शिकारीसाठी गावठी बॉम्बचा सापळा रचल्याचा प्रकार येथील ग्रामस्थ सागर तांदळे आणि निलेश शिगवण यांनी गावचे पोलीस पाटील मंगेश नारकर याच्या निदर्शनास आणून दिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात पोलीस पाटील मंगेश नारकर यांनी सावर्डे पोलीसात फिर्याद दिली असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर तांदळे आणि निलेश शिगवण हे गावातील पोस्ताचा माळ या जंगली भागात आपले बैल शोधण्यासाठी गेले असता त्याना ठिकठिकाणी गावठी बॉम्ब विखरून ठेवलेल्या अवस्थेत दिसले. ग्रामीण भागात अशा प्रकारे गावठी बॉम्ब ठेवण्याचे प्रकार नियमित होत असल्यामुळे हे विखरून ठेवलेले गावठी बॉम्ब डुक्कर मारण्यासाठीच ठेवल्याची त्यांना खात्री झाली. त्यामुळे त्यांनी तात्काळ सदरची घटना गावचे पोलीस पाटील मंगेश नारकर यांच्या कानावर घालत हा प्रकार समोर आणला. या घटनेची पुढील चौकशी सावर्डे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड करत आहेत.
सदरची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड, पी ए गमरे, आर.टी. आरवट, महिला पो.बाणे यांनी घटनास्थळी तत्काळ पंचनामा केला. दरम्यान, सावर्डे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लाड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे याच्या
सहकार्याने रत्नागिरीतून तत्काळ बॉम्बशोधक पथक घटना स्थळी दाखल या पथकाने सदरचे 18 गावठी बॉम्ब ताब्यात घेऊन सुरक्षित ठेवले आहेत.
दरम्यान, कुशवीडे गावी सापडलेले गावठी बॉम्ब ठेवणारे आण बनवणारे यांचा शोध पोलीस घेत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत असून या परिसरात शिकारीचे मोठे रॅकेट असल्याची चर्चा असल्याची चर्चा सुरू असून लवकरच या अज्ञात इसमाचा शोध घेऊन कारवाई करू असं लाड यांनी बोलताना सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.