उदय जाधव, 16 जुलै मुंबई, 16 जुलै : महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात होत आहे, त्याआधीच शिवसेनेमध्ये इनकमिंग होत आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढलेले राहुल कलाटे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश होत आहे. राहुल कलाटे यांच्यासह पिंपरी-चिंचवडचे अन्य नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राहुल कलाटेंसोबत नवनाथ जगताप, संपतअप्पा पवार, अश्विनी विक्रम वाघमारे यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडमध्ये पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. आधी शिवसेनेमध्ये असलेले राहुल कलाटे ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, पण ही जागा राष्ट्रवादीने घेतली आणि नाना काटे यांना उमेदवारी दिली, त्यामुळे राहुल कलाटे अपक्ष रिंगणात उतरले. या पोटनिवडणुकीत कलाटे यांनी मोठ्या प्रमाणावर मतंही घेतली. ‘विरोधी पक्ष आहे कुठे?’, अधिवेशनाआधी मुख्यमंत्र्यांनी डिवचलं चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अश्विनी जगताप यांना 1,35,603 मतं मिळाली तर नाना काटे यांना 99,435 आणि राहुल कलाटे यांना 44,112 मतं मिळाली. चिंचवडच्या पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांना 47.23 टक्के, नाना काटे यांना 34.63 टक्के आणि राहुल कलाटे यांना 15.36 टक्के मतं मिळाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.