मुंबई, 20 सप्टेंबर : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणरा आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे. तसंच, मुख्यमंत्री शिंदे हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाण्याची शक्यता आहे. वेदांता-फॅाक्सकॉन प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकार खडबडून जागे झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पुन्हा एकदा दिल्ली गाठणार आहे. राज्यातील विविध रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीवारी करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील दोन दिवसात दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे. महाराष्ट्रातल्या विविध प्रकल्पांबाबत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री आश्विणी वैष्णव आणि नितीन गडकरी यांचीही भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी 30 मिनिटे चर्चा केली. मुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये झालेल्या फोनवरील चर्चेत प्रामुख्याने वेदांता आणि फॅाक्सकॅान प्रकल्प गुजरात राज्यात गेल्यामुळे तो प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी चर्चा झाल्याची माहिती समोर आली. आता या वादानंतर शिंदे हे दिल्लीला चालले आहे. (नारायण राणेंना कोर्टाचा दणका, 10 लाखांचा ठोठावला दंड, मुंबई पालिकेचा बंगल्यावर हातोडा पडणारच!) दरम्यान, फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचं प्रकरण ताजं असताना रायगड जिल्ह्यातला प्रस्तावित बल्क ड्रग्ज पार्कही गुजरातमध्ये नेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. बल्क ड्रग्ज पार्क रायगडमध्ये उभारण्याचं निश्चित झालं होतं. पण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा प्रकल्प गुजरातमध्ये उभारणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. ऐनवेळी बल्क ड्रग्ज पार्क गुजरातमध्ये कसं नेण्यात आलं असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.