जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आईनेच 6 वर्षीय मुलाला बेदम मारहाण करत गरम तव्यावर बसवलं अन्..; छ. संभाजीनगर हादरलं

आईनेच 6 वर्षीय मुलाला बेदम मारहाण करत गरम तव्यावर बसवलं अन्..; छ. संभाजीनगर हादरलं

आईची 6 वर्षीय मुलाला बेदम मारहाण (प्रतिकात्मक फोटो)

आईची 6 वर्षीय मुलाला बेदम मारहाण (प्रतिकात्मक फोटो)

चौकशी केली असता मुलांनी पोलिसांना सांगितलं, की आमचे वडील दुसरेच आहेत. आई नेहमी लहान भावाला उपाशी ठेवून मारहाण करते

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी छ.संभाजीनगर 16 जून : एक आई आपल्या मुलावर निस्वार्थी प्रेम करते. असं म्हणतात, की ती आपल्या मुलाला संकटात पाहून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याच्यासाठी काहीही करायला तयार असते. मात्र, आता छत्रपती संभाजीनगरमधून एक अशी घटना समोर आली आहे. ज्याबद्दल वाचून तुमचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. यात जन्मदात्या आईने आपल्या 6 वर्षांच्या मुलाला मारहाण करत, चटके दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. वाळूज भागातील घाणेगाव येथे एका आईने हे कृत्य केलं. या घटनेचा व्हिडिओ अज्ञाताने चाइल्ड हेल्पलाइनला पाठविला होता. यावरून चाइल्ड हेल्पलाइनच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने पीडित मुलासह त्याच्या दोन भावांची घरातून सुटका केली. महत्वाचं म्हणजे पोलीस घरी गेले असता ही 3 लहान मुलं घरात कोंडून ठेवण्यात आली होती. Beed news : पैशांसाठी ऊसतोड मजुरांच्या 6 मुलांना डांबलं, चिमुकल्यांचा छळ, मारहाण अन्… घरात अकरा वर्षांचा मोठा मुलगा, मधला आठ वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांचा मुलगा अशा तिघांना ठेवून पालक बाहेरगावी गेल्याचं पोलिसांना घरमालकाकडून समजलं. या तिघांनाही कोंडून ठेवण्यात आलं होतं. पोलीस ठाण्यात आणलेली तिन्ही मुले भुकेलेली होती . हे पाहून पोलिसांनी त्यांना आधी जेवण दिलं. त्यांची विचारपूस केली. चौकशी केली असता मुलांनी पोलिसांना सांगितलं, की आमचे वडील दुसरेच आहेत. आई नेहमी लहान भावाला उपाशी ठेवून मारहाण करते. त्याच्या पायाला चटके देते. इतकंच नाही तर त्याला आईने गरम तव्यावरही बसविलं होतं, असंही त्यांनी सांगितलं. या प्रकरणात आता पोलीस अधिक चौकशी करत आहेत. तिघा भावांची घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांना बालसुधारगृहात पाठवलं आहे…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात