अविनाश कानडजे, छत्रपती संभाजीनगर, 17 जुलै : सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथे तीन मुलांची आई असलेल्या 27 वर्षीय महिलेला गावातील सलमान शेख शकील या 25 वर्षीय युवकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. सदरील महिला ही हिंदू आणि तरुण मुस्लिम असल्याने तिला फूस लावून युवकाने अपहरण करून तिचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याची शक्यता असल्याचे महिलेच्या पतीने आणि गावकऱ्यांनी सांगितले. सोयगाव पोलिसांनी महिलेला पळवून नेलेल्या तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून या घटनेचा तपास जलद गतीने करावा आणि गावात जातीय तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता द्यावी अशी मागणी महिलेच्या पतीने आणि गावकऱ्यांनी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज गोंदेगाव बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे गावात कडकडीत बंद दिसून येत आहे. मात्र बेपत्ता पत्नीसाठी गाव बंद करण्याच्या पतीच्या या निर्णयाची जिल्ह्यात एकच चर्चा आहे. बीचवर खेळताना फुटबॉल समुद्रात गेला, तो काढण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू सोयगाव तालुक्यातल्या गोंदेगाव इथं तीन मुलांच्या आईला तरुणाने फूस लावून पळवून नेलं आहे. यानंतर महिलेच्या पतीने म्हटलं की, माझ्या पत्नीचं अपहरण करणाऱ्या तरुणासह त्याच्या कुटुंबाचा शोघ घेऊन गुन्हा दाखल करा, अन्यथा गाव बंद करण्यात येईल. तरुणाने दिलेल्या गाव बंदच्या हाकेला ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला असून गाव बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, महिलेच्या पतीने गावात आणि नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. तिचा कुठेच शोध न लागल्याने शेवटी त्याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली. पत्नीला तरुणाने आमिष दाखवून तिचं अपहरण केल्याचा आरोप पतीने केला आहे. संबंधित तरुण हा महिलेपेक्षा दहा वर्षांनी लहान असून तिचा घातपात होण्याची भीतीही पतीने व्यक्त केलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.