जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Wholesale Market : सर्वात स्वस्त कपडे मिळणारे संभाजीनगरचे मार्केट, लहान उद्योगासाठी आहे हक्काची जागा, Video

Wholesale Market : सर्वात स्वस्त कपडे मिळणारे संभाजीनगरचे मार्केट, लहान उद्योगासाठी आहे हक्काची जागा, Video

Wholesale Market : सर्वात स्वस्त कपडे मिळणारे संभाजीनगरचे मार्केट, लहान उद्योगासाठी आहे हक्काची जागा, Video

Wholesale Market : छत्रपती संभाजीनगरमधील ‘या’ मार्केटमध्ये इतर बाजरपेठांपेक्षा 50 टक्क्यांहून कमी किंमतीमध्ये कपडे उपलब्ध आहेत.

  • -MIN READ Aurangabad,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

    सुशील राऊत, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 29 मार्च : मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधील अनेक उद्योग प्रसिद्ध आहेत. येथील प्रॉडक्टची मराठवाड्यासह संपूर्ण देशभर विक्री होते. त्यामुळे देशभरातून ग्राहक येथील माल खरेदी करत असतात. संभाजीनगरमधील कपड्यांची बाजारपेठ देखील प्रसिद्ध आहे. शहरात जगभरतील ब्रँडचे कपडे उपलब्ध आहेत. त्याचवेळी होलसेल मार्केटही आहे. अवघ्या 50 रुपयांपासून कपडे जिथं मिळतात त्या शहरातील सर्वात स्वस्त मार्केटची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. कुठं आहे होलसेल मार्केट? संभाजी नगरच्या शहाजान आणि अंगूरी बाग भागात होलसेल रेटमध्ये कपडे मिळतात.  कोलकाता, दिल्ली, इंदूर, लुधियाना या देशातील मोठ्या मार्केटमधून इथं कपड्यांची आवक होती. सर्व वयोगटातील व्यक्तींचे कपडे इथं मिळतात. लहान मुलांचे कपडे तर अवघ्या पन्नास रुपयांपासून खरेदी करता येतात. बांधणीचे ड्रेस सर्वात स्वस्त मिळणारी मुंबईतील जागा, कमी पैशांमध्ये होईल मस्त शॉपिंग, Video या बाजारात मुलांचे पन्नास ते पाचशे रुपयांपर्यंत मिळणारे कपडे अन्य बाजारपेठे शंभर ते  हजार रुपयांपर्यंतच्या किंमतीमध्ये मिळतात. या बाजारपेठेत महिलांचे कपडे शंभर ते चारशे तर पुरुषांचे कपडे शंभर ते पाचशे या होलसेल रेटमध्ये मिळतात. हा दर इतर बाजारपेठांपेक्षा साधारण पन्नास टक्के कमी आहे. सर्व वयोगटातील सर्व प्रकारच्या कपड्यांची विक्री या बाजारपेठेत केली जाते. ‘छत्रपती संभाजी नगर शहरातील या भागात कपड्याची जुनी बाजारपेठ आहे. या बाजरपेठेतून अनेक जिल्ह्यांमध्ये  माल पुरविला जातो. या परिसरातील अनेक लहान-मोठे दुकानदारांचा आमच्या मालावर विश्वास आहे. ते इथं खरेदीसाठी येतात. आम्ही त्यांना सर्व प्रकारची व्हारयटी देतो, अशी माहिती कपडा विक्री असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम इस्राणी यांनी व्यक्त केलं.

    News18लोकमत
    News18लोकमत

    गूगल मॅपवरून साभार

    कुठे करणार खरेदी? बीएचआर मार्केट, महावीर चौक, अंगुरीबाग, छत्रपती संभाजीनगर, पिन. 431001

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात