मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /वाहन घेऊन घराबाहेर पडण्यापूर्वी घ्या 'ही' खबरदारी, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ

वाहन घेऊन घराबाहेर पडण्यापूर्वी घ्या 'ही' खबरदारी, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ

Traffic rules: वाहनचालकांनी घराबाहेर पडतानाही पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे. अन्यथा त्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

Traffic rules: वाहनचालकांनी घराबाहेर पडतानाही पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे. अन्यथा त्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

Traffic rules: वाहनचालकांनी घराबाहेर पडतानाही पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे. अन्यथा त्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

    सुशील राऊत,प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर, 23 मार्च : दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या अपघाताला वाहतूकीच्या नियमांचं उल्लंघन हे प्रमुख कारण असतं. छत्रपती संभाजी नगर शहरातील  हे प्रकार रोखण्यासाठी आरटीओकडून कठोर पावलं उचलली जात आहेत. आरटीओकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे वाहनचाकांनीही सतर्क राहणं आवश्यक आहे. घरातून बाहेर पडताना केलेली एका चुकीमुळे तुम्हाला मोठा आर्थिक दंड बसू शकतो.

    काय होणार कारवाई?

    छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहनचालकांकडील कागदपत्रांची तपासणी वाहतूक पोलिसांकडून केली जात आहे. विनापरवाना किंवा कागदपत्राशिवाय वाहनं चालवल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. हा दंड दुचाकीच्या किंमती एवढा किंवा त्याहून अधिक दंड तुमच्यावर आकारला जाऊ शकतो. या प्रकरणात घरी कागदपत्र विसरली तरीही सवलत मिळणार नाही. त्यामुळे घरातून बाहेर पडताना केलेली घाईचा फटका बसण्याची शक्यता आहे.

    Video : मित्राची आई खड्ड्यात पडली म्हणून चिमुकल्यांनी रस्त्यावरील खड्डेच बुजून टाकले

    नवा कायदा काय?

    वाहन चालवताना परवाना नसेल तर पाच हजार रुपये किंवा त्याहून अधिकचा दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते  हाच गुन्हा दुसऱ्यांदा केल्यास त्या गुन्ह्यांमध्ये दहा हजार रुपये किंवा त्या पेक्षाही अधिकची रक्कम दंड म्हणून  एक वर्षाची शिक्षा किंवा दोन्हीही शिक्षेची तरतूद आहे. अनेक वेळा परवाना रद्द झाल्यानंतरही वाहन चालवले जाते असे वाहन चालवल्यास तब्बल दहा हजार रुपये किंवा त्या पेक्षाही अधिक रक्कम आणि तीन महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

    अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवताना अपघात झाल्यास संबंधित वाहनाच्या मालकाला जबाबदार धरलं जाणार आहे. या प्रकरणात 25 हजार रुपये दंड आणि तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. त्याचबरोबर त्या वाहनाची नोंदणी एक वर्षासाठी रद्द केली जाऊ शकते. वाहन चालवणाऱ्या मुलाला 25 वर्षापर्यंतचा होईपर्यंत परवाना दिला जात नाही.

    केंद्र सरकारने नव्या वाहन धोरणात सुधारणा केली आहे मोटार वाहन कायदा हा एक सप्टेंबर 2019 पासून लागू करण्यात आला आहे. मात्र जवळ दंडाची तरतूद असल्याने असंतोष टाळण्यासाठी या कायद्यासाठी राज्यांनी या कायद्याला स्थगिती दिली होती मात्र आता एक जुलै 2022 पासून हा कायदा महाराष्ट्रात लागू झालेला आहे. आटीओने पकडलेल्या दुचाकीला दंड म्हणून अनेक वेळा तीस हजारांपेक्षा अधिकची रक्कम असते. त्यामुळे ती गाडी वाहन मालकाला सोडून द्यावी लागते.

    डीजी लॉकरची सोय आवश्यक

    वाहनधारकांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या डीजी लॉकर यामुळे वाहनधारकांना आता प्रत्यक्षात मूळ कागदपत्र सोबत ठेवण्याची गरज नसते. या अ‍ॅप्लिकेशनमुळे कोणतीही कागदपत्र सहज सेव्ह करता येतात. यामध्ये वाहन परवाना, आरसी बुक, विमा परवाना प्रमाणपत्र नोंदणी प्रमाणपत्र याा समावेश आहे. यामुळे वाहनधारकांनी वाहन चालवताना वैद्य प्रमाणपत्र परवाना व कागदपत्र डीजे लॉकर मध्ये वापरणे आवश्यक आहे वाहनधारकांनी नियमांचा भंग करू नये अन्यथा त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येईल, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी केले आहे.

    First published:
    top videos

      Tags: Chhatrapati Sambhaji Nagar, Local18, Traffic Rules