मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video : मित्राची आई खड्ड्यात पडली म्हणून चिमुकल्यांनी रस्त्यावरील खड्डेच बुजून टाकले; 'न रहेगा बाँस न बजेगी बांसुरी'

Video : मित्राची आई खड्ड्यात पडली म्हणून चिमुकल्यांनी रस्त्यावरील खड्डेच बुजून टाकले; 'न रहेगा बाँस न बजेगी बांसुरी'

चिमुकल्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवले

चिमुकल्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवले

छत्रपती संभाजीनगमधून एक कौतुकास्पद बातमी समोर आली आहे. मित्राची आई खड्ड्यात पडल्यानंतर चिमुकल्यांनी केलेल्या कृतीचं शहरभरात कौतुक होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

छत्रपती संभाजीनगर, अविनाश कानडजे : छत्रपती संभाजीनगमधून एक कौतुकास्पद बातमी समोर आली आहे. मित्राची आई खड्ड्यात पडली म्हणून चिमुकल्यांनी चक्क रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा निर्धार केला. ते केवळ निर्धारच करून थांबले नाहीत तर त्यांनी काम देखील सुरू केलं. खड्डे बुजवतानाचा या चिमुकल्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून या चिमुकल्यांचं कौतुक होत आहे.

नागेश्वरवाडीमधील घटना  

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील नागेश्वरवाडी परिसरातील आहे. नागेश्वरवाडी परिसरात रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे एक अपघात झाला होता. ज्यामध्ये या चिमुकल्यांच्या मित्राची आई खड्ड्यात पडली होती. त्यानंतर या चिमुकल्यांनी या परिसरातील खड्डे बुजवण्याची मोहिम हाती घेतली. पुन्हा असे अपघात होऊ नये यासाठी हे चिमुकले सरसावले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्थरातून या चिमुकल्यांचं जोरदार कौतुक होत आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय? 

चिमुकल्यांचा खड्डे बुजवतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही चिमुकले खड्डे बुजवताना दिसत आहेत. काय करता असं त्यांना विचारले असता, आमच्या मित्राची आई खड्ड्यात पडली. त्यामुळे पुन्हा असा अपघात होऊ नये यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजवत असल्याचं या चिमुकल्यांनी सांगितलं.

First published:

Tags: Chhatrapati Sambhaji Nagar