जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुख्याध्यापक असावा असा! शाळेत विजेचा अभाव असल्यामुळे स्वखर्चातून खरेदी करून दिले इन्व्हर्टर Video

मुख्याध्यापक असावा असा! शाळेत विजेचा अभाव असल्यामुळे स्वखर्चातून खरेदी करून दिले इन्व्हर्टर Video

मुख्याध्यापक असावा असा! शाळेत विजेचा अभाव असल्यामुळे स्वखर्चातून खरेदी करून दिले इन्व्हर्टर Video

विजेचा अभाव असल्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास अडचणी निर्माण होतात. यामुळे मुख्याध्यापकाने स्वखर्चातून शाळेसाठी इन्व्हर्टर खरेदी करून दिले आहे.

  • -MIN READ Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
  • Last Updated :

छत्रपती संभाजीनगर, 24 जुलै : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. पावसाळ्याच्या दिवसामध्ये ग्रामीण भागामध्ये विजेचा अभाव असतो. त्यामुळे  शाळेतील विद्यार्थ्यांना वेळेत संगणकाचे शिक्षण घेता येत नाही. विजेचा अभाव असल्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास अडचणी निर्माण होतात. यामुळे  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील दादेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाने स्वखर्चातून शाळेसाठी इन्व्हर्टर खरेदी करून दिले आहे. यामुळे मुख्याध्यापक दिलीप वैष्णव यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. शाळेत राबवतात वेगवगेळे उपक्रम  दिलीप वैष्णव हे 2018 पासून दादेगाव ता.पैठण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. दिलीप वैष्णव हे शाळेमध्ये अल्पबचत बँक, शैक्षणिक सहली, क्षेत्रभेट, ग्रंथालय वापर, शालेय स्वच्छता, बालसभा, दिनांकाचा पाढा, चावडी वाचन, प्रयोग शाळा वापर, संगणक शिक्षण, हस्ताक्षर सुधार, शालेय बाग,वृक्षारोपण टाकाऊ पासून टिकाऊ असे विविध उपक्रम राबवित असतात. विशेष म्हणजे हे सर्व उपक्रम राबवित असताना मुख्याध्यापक दिलीप वैष्णव हे शाळा भरण्याच्या अर्धातास अगोदर आणि शाळा सुटल्यावर राबवितात.

News18लोकमत
News18लोकमत

 संगणकाचे शिक्षण देण्यासाठी वीजेचा अभाव  सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र विद्युत पुरवठा खंडित होत असतो. विशेष म्हणजे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वीज गुल असते. दादेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अवतीभवती संपूर्ण झाडी असल्याने वर्गामध्ये अंधारमय वातावरण राहत असते. त्यामुळे वर्गातील शिक्षकांना विद्यार्थ्यांना अध्यापन करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता.

साडेतीन लाख विद्यार्थ्यांत मारली बाजी, छत्रपती संभाजीनगरचा श्लोक राज्यात पहिला

तसेच येथील विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण देण्यासाठी वीजेचा अभाव असल्याने अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे मी शाळेसाठी इन्व्हर्टर खरेदी करून दिले तसेच पुढील वर्षी शाळेतील संपूर्ण खोल्यांना रंग रंगोटीचा खर्च स्वखर्चातून करणार असल्याचे मुख्याध्यापक दिलीप वैष्णव यांनी सांगितले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात