छत्रपती संभाजीनगर, 23 जुलै : नुकताच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील पोद्दार शाळेचा विद्यार्थी श्लोक बाहेती हा राज्यामध्ये पहिला आला आहे. त्याला 298 पैकी 280 गुण मिळाले. इयत्ता आठवीसाठी 3 लाख 56 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 55 हजार 500 विद्यार्थी पात्र ठरले. या पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी चौदा हजार मुलांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतही मिळवलं यश श्लोक बाहेती हा छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरामध्ये राहतो. श्लोकचे वडील व्यवसाय करतात तर आई ही गृहिणी आहे. श्लोकने इयत्ता पाचवीत असताना ही शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती. पण त्याच्यामध्ये त्याचा चौथा क्रमांक आला होता. तेव्हा त्याला आनंद झाला होता पण मनामध्ये पहिला क्रमांक न आल्याची खंत होती. त्यामुळे आठवीच्या परीक्षेत जोमाने अभ्यास करून यश मिळवण्याचा निश्चय केला. आता राज्यात पहिला क्रमांक पटकावत त्यानं आपला संकल्प पूर्ण केला आहे, असे श्लोक सांगतो.
श्लोकनं सांगितला यशाचा मंत्र “मी दररोज दोन तासाच्या वरती स्कॉलरशिपचा अभ्यास करायचो. माझं मराठी कच्चं असल्यामुळे मी सगळ्यात जास्त भर हा मराठी वरती देत होतो. मराठी न्युज पेपर वाचत होतो. नंतरच्या एक तासामध्ये मी बुद्धिमत्ता व गणिताचा अभ्यास केला. सध्या जे विद्यार्थी आठवीला आहेत त्यांनी या परीक्षेची तयारी करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जो विषय अवघड जातो त्या विषयावरती अधिक मेहनत घ्या. वेळेचे व्यवस्थित नियोजन करा. आपले शिक्षक जे सांगतात त्या गोष्टींचे पालन करा. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा. यामुळे तुम्हाला नक्कीच यश भेटेल,” असा सल्ला श्लोक इतर विद्यार्थ्यांना देतो. पोट्यांनो, क्लास वन अधिकारी व्हायचं व्हय तुम्हाला? करळे गुरजींचा स्पेशल कानमंत्र ऐका VIDEO श्लोकला बनायचंय इंजिनियर श्लोक लहानपणापासूनच हुशार आणि जिद्दी आहे. आता तो आठवीच्या परीक्षेमध्ये पहिला आलाय. आई-वडील म्हणून आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. त्याला भविष्यात आयआयटी इंजिनिअर बनायचे आहे. त्याच्यासाठी त्याला शुभेच्छा, असं श्लोकची आई अर्चना बाहेती म्हणतात. तर पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत चौथा आलो होतो. आता मी राज्यात पहिला आलो आहे. याचा मला खूप जास्त आनंद होतोय, असं श्लोक सांगतो.