सुशील राऊत, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 18 एप्रिल : पारंपरिक शेती केल्यामुळे शेतकऱ्यांचे बऱ्याच वेळा नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी कृषी विषयक नवनवीन तंत्रज्ञान आणि संशोधन याबाबतची माहिती शेतकऱ्यांना मिळावी यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौरे आयोजित करण्यात येत होते. मात्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शेतकरी अभ्यास दौरे मागील 4 वर्षांपासून बंद झाले आहेत. यामुळे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला शेतकऱ्यांना मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात सर्वात मोठा व्यवसाय म्हणून शेतीकडे बघितले जाते. मात्र, आजही या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पुरेशा प्रमाणात होत नाही. आजही पारंपारिक पद्धतीने शेतकरी शेती करत आहे. या पारंपरिक शेतीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे दरवर्षी नुकसान होत असते. शेतकऱ्यांचे दरवर्षी होणारे नुकसान बघून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी शेती करावी.
समृद्ध शेतकऱ्यांनी वापरलेल्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात येत होतं. या अभ्यास दौऱ्यानंतर अनेक शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये करत होते. या अभ्यास दौऱ्यांचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होत असताना गेल्या 4 वर्षांपूर्वी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शेतकरी अभ्यास दौरे बंद झाले आहेत. प्रश्न दौऱ्यामध्ये सोडवले जात होते या अभ्यास दौऱ्यामध्ये देशातील आणि विदेशातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या शेतीबद्दल माहिती दिली जाते. यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांना घेऊन जाण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करतो आणि त्यानंतर संबंधित यशस्वी शेतकऱ्याची चर्चा करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळते. त्यांनी वापरलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर लागवडीची पद्धत येणाऱ्या अडचणी आणि पीक कोणते विक्रीसाठी उपयुक्त आहे. कोणती बाजारपेठ चांगली आहे. बियाणे कुठे मिळतात चांगले यासह शेतकऱ्यांसाठी नियमितचे प्रश्न या दौऱ्यामध्ये सोडवले जात होते.
Latur News: अवकाळीने भाजीपाला मातीमोल, टोमॅटोचा झाला लाल चिखल, Video
अभ्यास दौरे सुरू करण्यात यावी दिवसेंदिवस हवामानात होणाऱ्या बदल ऋतुचक्रात असलेली अनियमित्ता याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. पारंपारिक शेती केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समृद्ध झालेल्या शेतकऱ्यांच्या भागामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी नेल्यास महाराष्ट्रातील शेतकरी समृद्ध होतील. यामुळे अभ्यास दौरे सुरू करण्यात यावी, अशी मागणी सिल्लोड येथील शेतकरी नंदू जाधव यांनी केली आहे. संपर्क साधावा शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्या संदर्भात कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे यांना विचारले असता ते म्हणाले की, कोरोनाच्या दोन वर्षांमुळे शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे बंद करण्यात आले होते. मात्र आता कोरोना संसर्गजन्य आजाराची लाट ओसरली असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी जायचं आहे त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा.