जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिंदेंच्या शिलेदारानं गड राखला; पैठणमध्ये महाविकास आघाडीचा धुव्वा

शिंदेंच्या शिलेदारानं गड राखला; पैठणमध्ये महाविकास आघाडीचा धुव्वा

संदीपान भूमरे यांची बाजी

संदीपान भूमरे यांची बाजी

शिंदे गटाचे मंत्री संदीपान भूमरे यांनी आपला गड राखला आहे. भुमरे यांच्या गटानं पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे.

  • -MIN READ Aurangabad,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

छत्रपती संभाजीनगर, 1 मे : छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. शिंदे गटाचे मंत्री संदीपान भूमरे यांनी आपला गड राखला आहे. भुमरे यांच्या गटानं पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. संदीपान भूमरे यांच्या गटाने पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीत आकरा पैकी आकरा जागांवर विजय मिळवला आहे. पैठणमध्ये महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आलेली नाहीये.

News18लोकमत
News18लोकमत

भूमरे गटाचा विजय  आतापर्यंत राज्यातील जवळपास निवडणुका झालेल्या सर्वच बाजार समित्यांचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीने युतीला धक्का देत अनेक बाजार समित्यांमध्ये बाजी मारली. मात्र पैठणमध्ये संदीपान भुमरे यांनी आपला गड राखला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील आकरापैकी आकरा जागा संदीपान भुमरे यांच्या गटाने जिकंल्या आहेत. महाविकास आघाडीला या ठिकाणी एकही जागा जिंकता आलेली नाहीये. एकीकडे राज्यात बाजार समित्यांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे संदीपान भूमरे यांनी मात्र पैठण कृष्णी उत्पन्न बाजार समितीत एकही जागा न गमवता एक हाती सत्ता आणली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात