जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / MPL 2023 : आईचा होता विरोध, वडिलांनी दिला पाठिंबा, धोनीचा चेला MPL गाजवणार, पाहा Video

MPL 2023 : आईचा होता विरोध, वडिलांनी दिला पाठिंबा, धोनीचा चेला MPL गाजवणार, पाहा Video

धोनीचा चेला MPL साठी सज्ज

धोनीचा चेला MPL साठी सज्ज

महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2023) ही स्पर्धा 15 जूनपासून पुण्यात सुरू होत आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

प्राची केदारी, प्रतिनिधी पुणे, 12 जून : इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेनं भा्रतीय क्रिकेटचा चेहराच बदलून टाकलाय. या स्पर्धेनं अनेक खेळाडू टीम इंडियाला दिले आहेत. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या देखील ही स्पर्धा यशस्वी ठरली आहे. या स्पर्धेपासून प्रेरणा घेत प्रत्येक देशानं टी20 लीग सुरू केलीय. त्याचबरोबर आपल्या देशातील वेगवेगळ्या क्रिकेट असोसिएशननंही त्यांची टी20 लीग स्पर्धा सुरू केली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं (एमसीए) यावर्षीपासून महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) स्पर्धेचं आयोजन यावर्षी पहिल्यांदाच केलं आहे. 15 ते 29 जून दरम्यान पुण्यातील गहुंजे क्रिकेट स्टेडिअममध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सोलापूर या 6 शहरांच्या टीम पहिल्यावर्षी होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, राजवर्धन हंगरगेकर यासारखे आयपीएल आणि अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धा गाजवलेले खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्याचबरोबर अनेक नवोदित खेळाडूंनाही मोठा प्लॅटफॉर्म या निमित्तानं मिळणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

धोनीचा शिष्य गाजवणार MPL एमपीएलमध्ये छत्रपती संभाजी किंग (सीएसके) या टीममक़ून हितेश वाळूंज हा पुण्यातील खेळाडू खेळणार आहे. 30 वर्षांचा हितेश गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या पातळीवरच्या क्रिकेट स्पर्धा खेळतोय. लेफ्ट आर्म स्पिनर असलेला हितेश हा उपयुक्त बॅटर देखील असून त्यानं यापूर्वी महाराष्ट्राच्या टीमचंही प्रतिनिधित्व केलंय. त्याचबरोबर तो पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज टीममध्ये नेट बॉलर देखील होता. हितेशला अन्य कोणत्याही भारतीय मुलाप्रमाणेच क्रिकेटची आवड होती. पण, त्यानं क्रिकेट खेळावं हे त्याच्या आईला मान्य नव्हतं. वडिलांनी मात्र आपल्याला नेहमीच पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्यामुळेच क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पूर्ण केल्याचं हितेशनं सांगितलं. माझ्या टाइमलाइनवर अचानक शेजारी.. भारताच्या पराभवानंतर इरफान पठाणचे ट्विट, पाकिस्तानी ट्रोलर्सवर निशाणा एमकॉमपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेल्या हितेशसाठी एमपीएल स्पर्धा हा महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं मोठी संधी मिळणार असून ती त्याचा फायदा उठवण्यासाठी सज्ज असल्याचं हितेशनं सांगितलं. महाराष्ट्राच्या खेळाडूंनाही त्यांचा खेळ दाखवण्याची मोठी संधी असल्याचं त्यानं सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात