जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WTC Final : माझ्या टाइमलाइनवर अचानक शेजारी.. भारताच्या पराभवानंतर इरफान पठाणचे ट्विट, पाकिस्तानी ट्रोलर्सवर निशाणा

WTC Final : माझ्या टाइमलाइनवर अचानक शेजारी.. भारताच्या पराभवानंतर इरफान पठाणचे ट्विट, पाकिस्तानी ट्रोलर्सवर निशाणा

इरफान पठाणचे ट्विट

इरफान पठाणचे ट्विट

WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. यानंतर माजी भारतीय इरफान पठाणला ट्रोल केले जाऊ लागले. यावर त्याने सडेतोड उत्तर दिले आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 जून : रविवारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव झाला. कांगारू संघाने पहिल्यांदाच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले. कांगारू संघाने भारताचा 209 धावांनी पराभव केला. भारताच्या पराभवानंतर सोशल मीडियावर खेळाडूंना ट्रोल केले जात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणही याचा बळी ठरला. पण, त्यानेही ट्रोलर्सवर पलटवार केला आहे. त्याने पाकिस्तानी ट्रोलर्सना चांगलेच खडसावले. याआधी गेल्या टी-20 विश्वचषकात भारताने पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर पराभूत केले होते. यानंतर इरफाननेही असेच काहीसे ट्विट केले होते. भारताच्या पराभवानंतर इरफान पठाणने सोशल मीडियावर लिहिले की, “टीम इंडिया WTC फायनलमध्ये पराभूत झाल्यामुळे अचानक सर्व शेजारी आनंदाने माझ्या टाइमलाइनमध्ये प्रवेश करत आहेत.” मी त्यांच्याबद्दल अगदी बरोबर होतो. इरफान पठाणच्या जुन्या ट्विटला उत्तर देताना एका पाकिस्तानी ट्रोलरने लिहिले, “काय मग शेजारी कसा होता रविवार?” इरफान, तू ठीक असशली अशी आशा आहे. दुसरीकडे, भारतीय चाहत्यांनी ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देत लिहिले की, आमचा संघ सलग 2 फायनल खेळला, तुमचा संघ घरच्या मैदानावरही कसोटी जिंकू शकलेला नाही. पाक पंतप्रधानांनाही सोडले नाही यापूर्वी इरफान पठाणने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावरही निशाणा साधला आहे. गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभव झाला होता. याबाबत शरीफ यांनी ट्विट करून टीम इंडियाच्या कामगिरीबद्दल माहिती दिली होती. यावर प्रतिक्रिया देताना इरफान म्हणाला होता की तुमच्या आणि आमच्यात हाच फरक आहे. आमच्या सुखात आम्ही सुखी आहोत आणि तुम्ही दुसऱ्यांच्या दुःखात सुखी आहात. म्हणूनच तुम्ही देश सुधारण्याकडे लक्ष दिले नाही. वाचा - एका दशकात टीम इंडिया बनली चोकर्स; 9 ICC स्पर्धेत गमावल्या 4 फायनल अन् 4 सेमीफायनल भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणचा पाकिस्तानविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे. पाकिस्तानमध्येच कसोटीत पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेत त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही त्याने पाकिस्तानला जोरदार धक्का दिला होता. अंतिम सामन्यात इरफानने 3 विकेट घेतल्या आणि तो सामनावीर ठरला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात