जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Paithan News : पाणी शेंदताना पाय घसरला अन् विवाहित महिलेसोबत घडली धक्कादायक घटना

Paithan News : पाणी शेंदताना पाय घसरला अन् विवाहित महिलेसोबत घडली धक्कादायक घटना

महिलेसोबत घडली धक्कादायक घटना

महिलेसोबत घडली धक्कादायक घटना

Paithan News : पैठण तालुक्यातून एका विवाहीत महिलेचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

  • -MIN READ Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
  • Last Updated :

महिलेसोबत घडली धक्कादायक घटनाअविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 17 जुलै : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पैठण तालुक्यातील मुरमा येथील 35 वर्षीय विवाहीत महिला विहीरीवर पाणी शेंदण्यासाठी गेलेली असता तिचा तोल जाऊन विहीरत पडल्याने मृत्यू झाला. छाया भरत मापारी, असे मृत महिलेचे नावं आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कशी घडली घटना? भरत मापारी व त्यांची पत्नी छाया मापारी हे सोमवारी सकाळी घरुन जेवण करून घरगुती कामे आटोपून स्वतः शेतात शेतपिकावर फवारणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी छाया विहिरीतून पाणी शेंदत होत्या. परंतु, छाया ह्यांचा तोल जाऊन त्या विहीरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. या अपघातात चिमुकल्यावरुन आईचे छत्र हरपलं असल्याने परिसरातील सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत. वाचा - तीन मुलांची आई 10 वर्षे लहान तरुणासोबत गेली पळून, पतीने दिली गाव बंदची हाक काही दिवसांपूर्वी एका तरुणाचाही गेला जीव वैजापूर तालुक्यातील डंवाळा येथे एका हृदयद्रावक घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. बकऱ्या चारणाऱ्या युवकाला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचादेखील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यात एकाचा मृतदेह मिळाला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. वैजापूर तालुक्यातील डंवाळा येथील बंधाऱ्याजवळ बकऱ्या चारणाऱ्या युवकाला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचादेखील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही युवकांची पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम राबविण्याचे सुरू आहे. तर शाहेद इरफान सय्यद याचा मृतदेह हा पाण्यातून बाहेर काढण्यात आला असून, दुसरा आयुष संतोष पडवळ डंवाळा याचे शोधकार्य सुरू आहे. आयुष हा बकऱ्या चारत असताना पाण्यात बुडत होता हे शाहिदने पाहिले. तो त्याला वाचवण्यासाठी गेला. मात्र, गाळ असल्यामुळे दोघेही फसल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात