छत्रपती संभाजीनगर,24 जुलै : ज्योतिष आणि रत्न शास्त्राचं जवळचं नाते आहे नैसर्गिक रित्या उपलब्ध असलेली रत्न ज्योतिष शास्त्रात विशेष मानली जातात. त 12 राशींसाठी वेगवेगळे विशिष्ट अशी रत्ने देखील उपलब्ध आहेत. या रत्नांमधील नीलम रत्नाचा फायदा कोणत्या राशीला आहे? याची माहिती आपण पाहणार आहोत. छत्रपती संभाजीनगरमधील ज्योतिषाचार्य उमेश कुलकर्णी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कुणाला होईल फायदा? नीलम रत्नाला इंग्लिशमध्ये ब्लू सफायर असे म्हणतात. हे रत्न विशेषतः मकर आणि कुंभ राशीसाठी लाभदायक रत्न आहे. ज्यांच्या जन्म कुंडलीमध्ये शुभ स्थानात ग्रह असतील ते हे रत्न वापरू शकतात. कुंडलीमध्ये लग्न घरात मकर आणि कुंभ असेल तर त्यांना हे जास्त लाभदायक रत्न ठरतं. प्रत्येकालाच साडेसातीचा त्रास असतो आणि त्यासाठी सुद्धा नीलम रत्न परिधान केल्यानंतर या त्रासातून आपली मुक्तता होते,’ असं कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं.
नीलम रत्न परिधान केल्यानंतर आपल्याला आर्थिक लाभ होतो. आपला भाग्योदय होतो. आयुष्यात शुभ काळ सुरू होतो. विशेषत: ज्यांची जन्मतारीख 4 आणि 8 आहे त्यांच्यासाठी हे अत्यंत लाभदायक रत्न आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीचा दोष असेल किंवा शनीची साडेसाती असेल असे लोक सुद्धा हे नीलम रत्न घालू शकतात,’ अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली. कोणत्या राशीला आहे पुष्कराजचा फायदा? ‘या’ राशीनं चुकूनही वापरु नये रत्न! आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ओरिजनल नीलम रत्नांची किंमत ही 9 हजार पासून ते एक लाखापर्यंत आहे. सर्वांनाच हे महागडे रत्न वापरणे परवडत नाही. त्यामुळे जामुनिया, निली, बॅक ऑफ नीलम, स्मोक स्टोन , सुलेमानी हकीक हे नीलमचे प्रमुख उपरत्न आहेत. त्यांनी उपरत्न परिधान करावी. ही त्यांच्या बजेटमध्ये बसणारी आहेत, असं कुलकर्णी यांनी सांगितलं.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)