जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / वडापाव सेंटरमध्ये सापडले 1 लाख 92 हजार; छ. संभाजीनगरमधील व्यक्तीने मालकाला शोधून परत केले

वडापाव सेंटरमध्ये सापडले 1 लाख 92 हजार; छ. संभाजीनगरमधील व्यक्तीने मालकाला शोधून परत केले

सापडलेले पैसे केले परत

सापडलेले पैसे केले परत

वडापाव सेंटर येथे कोणीतरी व्यक्ती आपले पैसे विसरून गेला होता. कामाच्या घाईगडबडीत कोणीतरी विसरून गेलेले बँकेतून काढलेले 1 लाख 92 हजार रूपये पिशवीत पडून होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अविनाश कानडजे, छत्रपती संभाजीनगर 28 जुलै : आजकाल दरोडा चोरी या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेकदा चोर घरफोडी करून किंवा रात्रीच्या वेळी घरात घुसून चोरी करतात. आता तर अनेक चोर इतके धीट झाले आहेत, की ते भरदिवसा रस्त्यावरही चोरी घडवून आणतात. आपल्या आसपास आपण दररोज अशा कित्येक चोरीच्या घटनांबद्दल ऐकतो आणि पाहातो. यामुळे माणसाचा माणसावरचाच विश्वास कमी होत चालला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या घटनांदरम्यानच आता एक अशी घटना समोर आली आहे, ज्याबद्दल वाचून आजही माणुसकी जिवंत आहे, यावर तुमचा विश्वास बसेल. आतापर्यंत आपण अनेक प्रकारच्या चोरी, लुटमार, दरोडा अशा घटना पाहिल्या आणि अनुभवल्या असतील. मात्र आजही माणुसकी टिकवत ईमानदारी दाखवणारी एक घटना बिडकिन येथे घडली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या बिडकिन येथे ही घटना घडली. यात वडापाव सेंटर येथे कोणीतरी व्यक्ती आपले पैसे विसरून गेला होता. Cyber Crime : ऑनलाईन चोरीचा नवा फंडा; गुन्हेगार देतायेत घरबसल्या तरुणांना पैसे, कारण वाचून बसेल धक्का कामाच्या घाईगडबडीत कोणीतरी विसरून गेलेले बँकेतून काढलेले 1 लाख 92 हजार रूपये पिशवीत बेवारस अवस्थेत पडून होते. ही बाब एका ग्राहकाच्या लक्ष आली. त्यानंतर या ग्राहकाने लगेचच वडापाव सेंटरच्या मालकाला याबद्दल सांगितलं. या दोघांनी मिळून मूळ मालकाचा शोध घेतला आणि त्याचे पैसे त्याला परत केले. या घटनेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात