मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /औषधी झाडाला गैरसमजुतीचा फटका, आरोग्याचं कवच असलेली 'खाज' वनस्पती धोक्यात!

औषधी झाडाला गैरसमजुतीचा फटका, आरोग्याचं कवच असलेली 'खाज' वनस्पती धोक्यात!

आरोग्याचं कवच म्हणून ओळखली जाणारे खाजेचं झाड नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती आता उघड झाली आहे.

आरोग्याचं कवच म्हणून ओळखली जाणारे खाजेचं झाड नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती आता उघड झाली आहे.

आरोग्याचं कवच म्हणून ओळखली जाणारे खाजेचं झाड नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती आता उघड झाली आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Aurangabad [Aurangabad], India

  सुशील राऊत, प्रतिनिधी

  छत्रपती संभाजीनगर, 27 मार्च : आपल्या देशात अनेक उपयोगी वनस्पती आहेत. अन्नधान्य, फळ याचबरोबर आरोग्यासाठीही या वनस्पतींचा उपयोग होतो. यापूर्वी भरपूर प्रमाणात आढळणाऱ्या वनस्पती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये खाज येण्याचा गुणधर्म असलेली कुहिरी या वनस्पतीचाही समावेश आहे. आरोग्याचं कवच म्हणून ओळखली जाणारी ही वनस्पती आता नामशेष होत असल्याचं छत्रपती संभाजीनगरचे पर्यावरण अभ्यास संतोष पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

  औषधांमध्ये वापर

  संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार साधरण 5 हजार वर्षांपासून आयुर्वेदात 'कवच , कपीकच्छु ,आत्मगुप्त आदी नावाने या वनऔषधीचा उल्लेख आहे. पुरुषार्थ वाढवणारी बलवर्धक असणारे हे कवच बीज मनुष्यासह माकडांनाही प्रिय आहे.  या वनस्पतीच्या शेंगा मधील काळे बिज हे 100 पेक्षा जास्त आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरतात.पूर्वीच्या काळी राजे महाराजे तसंच ऋषी मुनी विविध स्वरूपात याचं सेवन करत असत. पण, भीती आणि गैरसमजामुळे ही वनस्पती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

  मराठवाड्यातील शेतकऱ्यांनो, कृषी विभागानं दिला तुमच्या पिकांसाठी महत्त्वाचा सल्ला!

  कुहरी वनस्पतीच्या बियांचा 'सेगमेंटल व्हिटिलिगो' या मज्जासंस्थेच्या कार्यात बिघाड होऊन त्वचेवर उमटणाऱ्या पांढऱ्या डागांवर  संतोष पाटील यांनी संशोधन केलं आहे. या विषयावरील त्यांचा रिसर्च पेपरी आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालाय. या विषयावर जगातील हे पहिलेच संशोधन असल्याचा दावा त्यांनी केला. भविष्यात अनेक संशोधकांना ही वनस्पती आकृष्ट करेल. त्याचबरोबर कॉमन सेलर या फुलपाखरुंचा जीवनक्रमही याच वेलीवर अवलंबून आहे. ते या वनस्पतीच्या पानांवर अंडी घालतात, अशी माहितीही पाटील यांनी दिली.

  तरुणांसाठी उपयुक्त वनस्पती..

  तरुण वर्ग जिममध्ये मोठ्या प्रमाणात जातो. स्नायू, बॉडी बिल्डिंगसाठी घातक स्टेरॉईड घेण्याऐवजी कवच बीजापासून बनवलेल्या बलवर्धक औषधाचं सेवन करणे योग्य आहे. आयुर्वेदात गुप्त अशा नावानं याचं उल्लेख असलेल्या या वेलीच्या बीजामुळे शांत झोप लागते. हा गुणधर्म अतिशय उपयोगी असल्याचं पाटील सांगतात.

  रमजानच्या उपवासांनाही महागाईचा फटका, पाहा का वाढले पेंड खजुराचे भाव, Video

  शेतकऱ्यांमध्ये जागृती

  पार्किन्सन सारख्या गंभीर आजारात लेवाडोपा हे औषध वरदान ठरलं आहे. हे नैसर्गिक औषध कवचबीजमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे वनस्पतीच्या संवर्धनासाठी शेतकऱ्यांमध्ये जनगागृती करणार आहे. वनजागर या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना हे महत्त्व पटवून देत असल्याचं पाटील यावेळी म्हणाले.

  First published:
  top videos

   Tags: Chhatrapati Sambhaji Nagar, Local18