सुशील राऊत, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 25 मार्च : गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये बदल होत आहे. उन्हाळा सुरू झाला असला तरी पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेत वातावरण आहे. शेतकऱ्यांची ही चिंता दूर व्हावी यासाठी कृषी हवामान केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजी नगरच्या वतीने 29 मार्चपर्यंत शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज आणि पिकनिहाय सल्ला दिला आहे.
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी, कृषी विज्ञान केंद्र व जिल्हा कृषी हवामान केंद्र यांच्या वतीने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा सल्ला दिला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईतून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार संभाजीनगरमध्ये पुढील पाच दिवस वातावरण कोरडे तसंच अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
पिकनिहाय सल्ला
1)ऊस: ऊसाची लागवड करून दीड महिन्याचा कालावधी झाला असल्यास शंभर किलो नत्र प्रति हेक्टरी युरियाद्वारे द्यावे.तसेच पिकानुसार पाण्याची व्यवस्था करावी.
2) रब्बी मका: काढणीस तयार असलेली रब्बी मक्का पिकाची काढणी करून घ्यावी. तसेच काढणी केलेल्या पिकाची मळणी करून घेऊन धन्या सुकून देऊन योग्य ठिकाणी साठवणूक करून ठेवावे.
शेतकऱ्यांनो, पुढील आठवड्यात 'या' पद्धतीनं घ्या पिकांची काळजी, वाचा कृषी विभागाचा सल्ला
3) गहू: काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी करून घ्यावी. तसेच काढणी केलेल्या पिकाची मळणी करून घेऊन त्याला योग्य प्रकारे ऊन देऊन योग्य ठिकाणी साठवून करून ठेवावे. गहू पिकाची काढणी केलेल्या शेतात त्याच्या औषश शेतात जाळून टाकू नये. ते मूळ ठिकाणी कुजवावे यासाठी एकरी 50 किलो युरिया अधिक चाळीस सिंगल सुपर फॉस्फेट समप्रमाणात शेतात बसवावी नंतर पलटी नांगरणी करून घेतल्यास येणाऱ्या हंगामापर्यंत हे अवशेषाचं उत्कृष्ट खत तयार होतं.
४) उन्हाळी बाजरी : -बाजरी पिकामध्ये तन व्यवस्थापन करावे तसेच पिकाची पेरणी करून एक महिना पूर्ण झाला असल्यास नत्राचा दुसरा हप्ता द्यावा.
5) कांदा : काढणीस तयार असलेल्या कांदा पिकाची काढणी करून घ्यावी. काढणीनंतर कांदा शेतातच पातीसह सुखदेव कांद्याच्या ओळी अशा तऱ्हेने लावल्यात की जेणेकरून पहिल्या ओळीतच कांदा दुसऱ्या ओळीतील पातीने झाकला जाईल अशा प्रकारे कांदा शेतात चार दिवस सुकू द्यावा त्यानंतर चार सेंटीमीटर लांब मान ठेवून पात कापावी चिंगळी जोड कांदा आलेले आणि खराब कांदे वेगळे काढावेत. उर्वरित कांदा सावलीत ढीग करून पंधरा दिवस सुखवावा या काळात कांद्याच्या माना वगळून पिरंगळतात वरचा पापुद्रा वाळून कांद्यातला घट्ट चिकटतो अशाप्रकारे वाळलेला कांदा अधिक काळ चांगला जाईल.
6)आंबा:फळाची काढणे अवस्था:-आंबा फळाची गळ कमी करण्यासाठी तसेच फळांची प्रत सुधारण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट 100 ग्राम प्रतिदहा लिटर पाण्यात मिसळून गोटी आणि सुपारीच्या आकाराची असताना फवारणी करावी.
7)भाजीपाला : गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे तसेच वांगी आणि टोमॅटो पिकामध्ये फळ पोखरणाऱ्या आळ्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 15 ते 20 कामगंध सापळे लावावीत तसेच भाजीपाला पिकात रस शोषण करणाऱ्या किड्याच्या व्यवस्थापनासाठी पिवळे व निळे चिकट सापळे छोट्या आकाराची एकरी 25 ते 30 या प्रमाणात लावावेत.
पशूसंवर्धन: सध्या स्थितीत जनावरांमध्ये गोचीड या रक्त शोषून घेणाऱ्या किड्याचा प्रादुर्भाव दिसत आहे याचे व्यवस्थापनासाठी नियमित गोठ्याची स्वच्छता करणे गरजेचे आहे तसेच पशुधनावर पाच टक्के निंबोळी अर्काचा शेडकाव आठवड्यातून दोन वेळा करणे गरजेचे आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chhatrapati Sambhaji Nagar, Farmer, Local18, Weather Forecast