छत्रपती संभाजीनगर, 22 मार्च : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. हत्या, आत्महत्या, तसेच प्रेम प्रकरणातून खुनाच्याही धक्कादायक घटना समोर येत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्येही आत्महत्येच्या घटना सात्याने समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
सोयगाव तालुक्यात पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. पती-पत्नीच्या आत्महत्येने महालब्धा गावात शोककळा पसरली आहे. सोयगाव तालुक्यातील सावळदबारा सर्कल मधील महालब्धा या गावात पती-पत्नीने एकाच वेळी शेतात रात्रीच्यावेळी आत्महत्या केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
पतीने रात्रीच्या वेळी शेतात गळफास घेऊन तर पत्नीने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडीस आली. संदीप आळेकर आणि लताबाई संदीप आळेकर, असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नावे आहेत. तर त्यांना तीन वर्षांचा मुलगा आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी दोघा पती-पत्नीने गावात ठोका तत्वावर शेती केली होती. त्यांनी एकाच वेळी आत्महत्या का केली? हे अजून अस्पष्ट आहे. याप्रकरणी फरदापुर पोलीस तपास करत आहेत.
शेतकरी जीवन संपवतोय; हा जुना विषय, कृषिमंत्री सत्तारांचं वक्तव्य
मुलगी बापावर गेली, सासरच्यांचे टोमणे ऐकून जन्मदात्रीने 3 महिन्यांच्या चिमुकलीला संपवलं -
नाशिकमध्ये घडलेल्या तीन महिन्यांच्या चिमुकलीच्या हत्या प्रकरणाला धक्कादायक असं वळण लागलं आहे. मुलीची हत्या करून जन्मदात्या आईनेच अज्ञात महिलेकडून मुलीचा खून झाल्याचा बनाव रचला होता. आईनेच या मुलीची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आल आहे. सासरच्याकडून होणाऱ्या जाचांला कंटाळून जन्मदात्या आईनेच या मुलीची गळा चिरून हत्या केलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Death, Local18, Wife and husband