मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /चित्रा वाघ यांना मोठा धक्का; 'ती' याचिका न्यायालयानं फेटाळली, अडचणी वाढणार?

चित्रा वाघ यांना मोठा धक्का; 'ती' याचिका न्यायालयानं फेटाळली, अडचणी वाढणार?

चित्रा वाघ

चित्रा वाघ

भाजप नेत्या चित्रा वाघ यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चित्रा वाघ यांची याचिका फेटाळून लावली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

छत्रपती संभाजीनगर :  भाजप नेत्या चित्रा वाघ यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चित्रा वाघ यांची याचिका फेटाळून लावली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्याविरोधात चित्रा वाघ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयानं चित्रा वाघ यांची याचिका फेटाळून आवली आहे. हा चित्रा वाघ यांच्यासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी एका प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात 50 लाख रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्या दाव्याविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे. हा चित्रा वाघ यांच्यासाठी मोठा धक्का मानण्यात येत असून, त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Chitra wagh, Court, High Court