जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लालपरीने कात टाकली, आली ई-शिवाई बस, खासगी गाड्यांचा पडेल विसर!

लालपरीने कात टाकली, आली ई-शिवाई बस, खासगी गाड्यांचा पडेल विसर!

एसटीच्या ताफ्यातील नवी बस

एसटीच्या ताफ्यातील नवी बस

महाराष्ट्रातील पहिली इलेक्ट्रिक बस ही कशी आहे? या बसमध्ये काय सुविधा आहेत? पाहा स्पेशल रिपोर्ट

  • -MIN READ Chhatrapati Sambhaji Nagar,Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
  • Last Updated :

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर 25 मे : एसटी महामंडळाची बस म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर पारंपरिक लाल रंगाची बस उभी राहते. गेल्या काही वर्षांमध्ये एसटीनंही कात टाकलीय. खासगी ट्रॅव्हल्सच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एसटीनं वेगवेगळ्या प्रकारच्या आधुनिक बस सुरू केल्यात. एसटीच्या ताफ्यात आता बहुप्रतीक्षित ई शिवाई बस दाखल झालीय. ही महाराष्ट्रातील पहिली इलेक्ट्रिक बस असून ती छत्रपती संभाजीनगर ते पुणे या मार्गावर ही बस धावणार आहे. कशी आहे बस? ई शिवाई बसचे भाडे हे शिवनेरी बस इतकंच आहे. संभाजीनगर ते पुणे मार्गावर सकाळी सहा ते दहा तसंच दुपारी चार ते रात्री 9 दरम्यान दर तासानं धावणार आहेत. या बसमध्ये 44 प्रवासी सिट असून ते आरामदायी आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी सिटच्या मधोमध मोबाईल चार्जिंगची सुविधाही या बसमध्ये देण्यात आलीय.

News18लोकमत
News18लोकमत

ही संपूर्ण बस एसी असून प्रवासाच्या दरम्यान काही अडचणी आल्या तर इमर्जन्सी बटणची व्यवस्थाही बसमध्ये करण्यात आलीय. सीटच्या जवळ प्रवाशांसाठी लाईटचीही सोय आहे. त्याचबरोबर रिडींग लॅम्पचीही सोय करण्यात आलीय, अशी माहिती छत्रपती संभाजीनगरमधील आगार प्रमुख लक्ष्मण लोखंडे यांनी दिली आहे. कडाक्याच्या उन्हात कोंबड्यांचा जीव गुदमरला, देशी जुगाड करून वाचवला जीव! Video किती आहे भाडं? संभाजीनगर ते पुणे दरम्यान धावणाऱ्या या बसचं भाडं हे 515 रुपये आहे. महिला तसंच अमृत योजनेतील प्रवाशांसाठी एसटी महामंडाळाच्या सर्व सोयी या बसलाही लागू आहेत. जास्तीत जास्त प्रवाशांनी या सेवेचा फायदा घ्यावा, असं आवान लोखंडे यांनी केलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात